vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लोकसेवा हक्क अधिनियमाची संवेदनशीलतेने अंमलबजावणी करा – राज्य सेवा हक्क आयुक्त एन रामबाबू यांचे निर्देश

लोकसेवा हक्क अधिनियमाची संवेदनशीलतेने अंमलबजावणी करा – राज्य सेवा हक्क आयुक्त एन रामबाबू यांचे निर्देश….

बुलढाणा, प्रतिनिधी : लोकसेवा हक्क अधिनियमाची संवेदनशीलतेने अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोग, अमरावतीचे आयुक्त एन. रामबाबू यांनी विभाग प्रमुखांना दिले.

आयुक्त एन. रामबाबू हे बुधवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना त्यांनी विविध विभागांच्या लोक सेवांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, मुख्य वनसंरक्षक सरोज गवस, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशीव शेलार आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्या सेवांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजेत. लोकांच्या कर रुपी प्राप्त पैशांतून शासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन मिळते. त्यामुळे लोकांना सेवा पुरविणे ही प्रशासनाची जबाबदारी असून ती नैतिक जबाबदारी समजून लोकांना शासकीय सेवांचा लाभ द्यावा, असेही आयुक्त एन रामबाबू यावेळी म्हणाले.

शासकीय विभागातील सुधारणांविषयी आढावा,प्रशासनात काम करत असतांना कार्यालय किंवा विभागातील सुधारणांविषयी आयुक्त एन रामबाबू यांनी आढावा घेतला. विभागाच्या योजना, कार्यप्रणाली आदी सुधारणांविषयी आपआपल्या विभांगाना प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन देखील आयुक्त एन रामबाबू यांनी अधिकाऱ्यांना केले.

००००

संबंधित पोस्ट

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीक्षेत्र चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जयंती महोत्सव

जिल्हा महिला, बाल विकास सनियंत्रण समिती बैठकबालकामगार ,बालभिक्षेकरी व शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छठपूजा सणानिमित्ताने संभाव्य गर्दीच्या नियोजनासाठी भारतीय रेल्वे पुढील 5 दिवसांमध्ये 1,500 विशेष गाड्या चालवणार; प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास केंद्रस्थानी असणार

vishwatmaklokswamivarta

मातंग समाजाला राजकीय वाटा मिळवून देणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

युवक युवतींना जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बिहार निवडणूक आणि पोटनिवडणुका 2025: मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta