vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसायस्थानिक बातम्या

बहुराष्ट्रीय जबील कंपनीकडून आयटीआयमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण; विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी

बहुराष्ट्रीय जबील कंपनीकडून आयटीआयमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण; विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी..

राज्य प्रतिनिधी -अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय जबील कंपनीने महाराष्ट्रातील काही निवडक आयटीआयमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील जबील कंपनीच्या शिष्टमंडळाने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयातील दालनात भेट घेतली. यावेळी कंपनीने महाराष्ट्रातील आयटीआय संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री लोढा यांनी यावेळी दिले.

तरुणांना रोजगाराभिमुख आणि स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभाग विविध उपक्रम राबवत असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. याच अनुषंगाने जगभरातील नवे नवे तंत्रज्ञान आयटीआयच्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न असल्याचेही मंत्री लोढा म्हणाले. जबील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला तसेच कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख गुंडूराव पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत निवडक आयटीआय संस्थांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करणे, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रासाठी इंडस्ट्री रेडी संकल्पनेनुसार कौशल्य प्रशिक्षण देणे तसेच समकक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जबील कंपनीला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. तसेच राज्यभरात व्यापक प्रमाणावर रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी अन्य कंपन्यांचाही सहभाग वाढवण्यासाठी विभाग प्रयत्न करेल असेही मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींना अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण मिळणार असून त्याचा भविष्यात मोठा लाभ होणार आहे. या बैठकीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख यांनी आयटीआयमध्ये सध्या सुरु असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती जबील कंपनीच्या शिष्टमंडळाला दिली.

 

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे१,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (#एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक

विदर्भातील पूरस्थितीचा आढावा-मदत आणि पुनर्वसन कार्य तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश- मंत्री गिरीश महाजन

तेल काढणी युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन*18 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास मुदत

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट; आरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

देशात लवकरच १०० टक्के इथेनॉल इंधनावर वाहने धावणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौरव

vishwatmaklokswamivarta