vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धर्माबाद नगरपरिषद निवडणूक;इनानी मंगल कार्यालयातील प्रकाराची प्रशासनाकडून तात्काळ दखल…

धर्माबाद नगरपरिषद निवडणूक;इनानी मंगल कार्यालयातील प्रकाराची प्रशासनाकडून तात्काळ दखल…

नांदेड प्रतिनिधी #धर्माबाद #नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत आज दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून सदर मतदान प्रक्रिये दरम्यान प्रसारमाध्यमांकडून धर्माबाद येथील इनानी मंगल कार्यालय येथे मतदारांना कोंडले असल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

सदरील बातमीच्या अनुषंगाने धर्माबाद येथील निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुरेखा स्वामी व पोलीस निरीक्षक सदाशिव बडीकर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपासणी केली असून, संबंधित मंगल कार्यालय मालकावर जमावबंदी व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबाबत फौजदारी कार्यवाही करण्यात येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी धर्माबाद श्रीमती सुरेखा स्वामी यांनी कळविले आहे,अशी माहिती नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

०००००

संबंधित पोस्ट

उदंड प्रतिसादाने ‘महालक्ष्मी सरस -२०२६’ प्रदर्शनाची सांगता; २२ कोटींहून अधिक रुपयांची रेकॉर्डब्रेक उलाढाल ग्रामीण महिलांच्या कष्टाचे नवी मुंबईत झाले सोने ; ‘स्मार्ट’ सुविधांनी जिंकली मुंबईकरांची मने

डॉ.आंबेडकर सभागृहात आज (दि.८)पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

बैलपोळ्यासह बुलढाण्यात झाला अनोखा “ट्रॅक्टर पोळा”!मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी; शेकडो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होऊन सणाला दिला आधुनिक रंग.

सांगली जिल्हा पंचायत समिती सभापती आरक्षण-2025 जाहीर

vishwatmaklokswamivarta

जालना येथील शेतकऱ्यांना मिळाले यंदा विक्रमी उत्पादन‘श्रीराम सुपर ५- एसआर-५ ’ बियाणांमुळे शेतपिकात उल्लेखनीय बदल

vishwatmaklokswamivarta

जलदगतीने मोजणी होण्यासाठी चांगल्या प्रतीचे रोव्हर्स खरेदी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार रोव्हर्स खरेदी आणि महसूलमधील कार्यालयाच्या बांधकामांच्या निधीला प्रशासकीय मान्यता