vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारणस्थानिक बातम्या

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज कल्याण पूर्व येथे #शिवसेना विजय निर्धार सभा मोठ्या उत्साहात आणि कल्याणकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादात संपन्न

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज कल्याण पूर्व येथे #शिवसेना विजय निर्धार सभा मोठ्या उत्साहात आणि कल्याणकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादात संपन्न

राज्य प्रतिनिधी-कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज कल्याण पूर्व येथे #शिवसेना विजय निर्धार सभा मोठ्या उत्साहात आणि कल्याणकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादात संपन्न झाली. यावेळी विरोधकांना चारी मुंड्या चित करून महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला. कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर यांनी आणि कोळी समाज बांधवांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला

याप्रसंगी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण पश्चिम जिल्हाप्रमुख रवी पाटील, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, कल्याण उल्हासनगर विधानसभा प्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक नीलेश शिंदे तसेच शिवसेना संभाव्य उमेदवार, पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने

शिवसेना कायम केलेल्या कामांचा बळावर निवडणुकीला सामोरी जाते, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे ६० हून अधिक नगराध्यक्ष निवडून आले. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी मतदारांनी शिवसेनेला भरभरून पाठिंबा दिला. आता याच बळावर महानगरपालिका निवडणुकीला देखील महायुती म्हणून आपण सामोरे जाणार असून आताही असाच पाठिंबा द्यावा असे आवाहन बहुसंख्येने उपस्थित कल्याणकर नागरिक बंधू भगिनींना केले. उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी केले

काही जण स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. आता त्यांना मराठी माणूस आठवू लागला आहे. मात्र तो जेव्हा वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथे नाईलाजाने फेकला गेला तेव्हा त्याची आठवण कुणाला आली नाही. त्याला क्लस्टर आणि पुनर्विकासाच्या माध्यमातून पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न राज्यातील महायुती सरकारने केला असल्याचे याप्रसंगी नमूद केले..

लाडक्या बहिणींनी कायम महायुतीला भक्कम साथ दिली. महिला भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणारी योजना आम्ही सुरू असून ती कधीही बंद होऊ देणार नाही, उलट तुम्हाला लखपती कसे बनवता येईल यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. महिलांसाठी लेक लाडकी लखपती योजना, उच्च शिक्षण मोफत देणारी योजना, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत अशा अनेक योजना सुरू केल्या असून त्यांचा मोठा फायदा महिलांना होत असल्याचे याप्रसंगी अधोरेखित केले.

कल्याण पूर्व येथे पुरेसे पाणी येत असल्याने आता विरोधकांना पाणी पाजण्यासाठी साऱ्यांनी सज्ज रहावे असे आवाहन केले. शहरात बेतुरकर पाड्यात क्लस्टर बांधणीला सुरुवात झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक केले, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, नेवाळी ते चक्की नाका १०० कोटींचा रस्ता, खानदेश भवन, मराठा भवन यांची उभारणी केली असल्याचे यावेळी नमूद केले. कल्याणचा सर्वांगीण विकास या माध्यमातून करण्यात आला असून आता विकासाचा हाच वेग कायम ठेवायचा असेल तर शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना आगामी महापालिका निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक *महसूलमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील मंदिर विश्वस्तांनी नोंदवला ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारुपाला’ तीव्र विरोध,सूचना आणि हरकती यांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढीचे महसूलमंत्र्यांचे आश्वासन !

vishwatmaklokswamivarta

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ

शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील खेळाडुंनी देशाचे नाव उंचावावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन

vishwatmaklokswamivarta

कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा — उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार रोहा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

पीसीपीएनडीटी कायदा अधिक प्रबळ करणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर स्त्री आधार केंद्राच्या वतीने आयोजित विकासासाठी निरंतर वाटचाल,बीजिंग चौथे विश्व संमेलनानंतरची तीस वर्षे : कृतीसत्र कार्यक्रमाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाची भूमिका -. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात बैठक