vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा पहिल्या क्रमांकावर आल्याचं सांगत आता मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा पहिल्या क्रमांकावर आल्याचं सांगत आता मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

राज्य प्रतिनिधी-कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा पहिल्या क्रमांकावर आल्याचं सांगत आता मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत प्रचंड यश भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला दिल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा अत्यंत आभारी आहे. हे यश आमच्या कार्यकर्त्यांचे आहे, हा त्यांचा विजय आहे.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री मा. जे.पी. नड्डाजी आणि कार्यकारी अध्यक्ष मा. नितीन नबीनजी यांच्या मार्गदर्शनात भाजपाने हे दणदणीत यश संपादन केले.

आतापर्यंत (दुपारी 3) जे कल/निकाल आले, त्यात 2017 च्या 94 च्या तुलनेत यंदा आम्ही 129 नगरपालिकांवर (45 टक्के) यश संपादन केले.महायुती म्हणून 215 नगरपालिका (74.65 टक्के) आम्ही जिंकल्या आहेत. (एकूण नगरपालिका : 288)नगरसेवकांच्या जागांचा विचार केला तर 2017 ला भाजपाला 1602 जागा मिळाल्या होत्या, त्या आता 3325 (47.82 टक्के) इतक्या झाल्या आहेत. म्हणजे दुपटीहून अधिक जागा भाजपाने जिंकल्या. महायुती म्हणून 4331 जागा (62.30 टक्के) आम्ही जिंकल्या आहेत. (एकूण जागा : 6952)महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात झालेली ही पहिली निवडणूक, मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. या निवडणुकीसाठी परिश्रम घेणारे माझे सहकारी नेते, कार्यकर्ते यांचेही अभिनंदन. आगामी महानगरपालिका निवडणुकीचा हा ट्रेलर आहे, याहून मोठे यश संपादन करण्यासाठी ताकदीने कामाला लागा, हेच आवाहन मी कार्यकर्त्यांना करतो.

 

(२८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दबदबा,शंभरहून अधिक ठिकाणी भाजपाची मुसंडी, २०१७ च्या तुलनेत भाजपाच्या नगरसेवकांमध्ये दुपटीनं वाढ.शिवसेनेची ५० हून अधिक तर राष्ट्रवादी काँग्रेसची ३५ हून अधिक जागांवर सरशी, महायुतीच्या ७५ टक्के नगरसेवकांनी मारली) बाजी.काॅग्रेस २५ हुन अधिक जागांवर विजयी, मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षांची जोरदार पीछेहाट, स्थानिक आघाड्यांना २० हून अधिक ठिकाणी यश.

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 29.09 टी.एम.सी. पाणीसाठा

मेळघाटात 10 मोबाईल टॉवरला मंजुरी*जिल्हा सनियंत्रण समितीची मान्यता

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”

जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झाली ऐतिहासिक पदयात्रा

जिल्ह्यात ७५१ पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण

शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससमाज कल्याण अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान..