vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मेहकर नगरपरिषद अध्यक्षपदी शिवसेना(उबाठा)चे किशोर गारोळे विजयी

मेहकर नगरपरिषद अध्यक्षपदी शिवसेना(उबाठा)चे किशोर गारोळे विजयी

बुलढाणा, प्रतिनिधी : मेहकर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे किशोर भास्कर गारोळे विजयी झाले आहेत. नगरपरिषदेतील एकूण २६ सदस्यांमध्ये काँग्रेसचे ११, शिवसेनेचे ९ आणि शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे ६ सदस्य निवडून आले आहेत.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत किशोर भास्कर गारोळे यांनी १०,२३९ मते मिळवून विजय संपादन केला. प्रभागानिहाय निकालात प्रभाग १ अ मधून शिवसेना (उ.बा.ठा.)च्या सतीष गोपाळ ताजने ६६० मते मिळवत विजयी ठरले, तर प्रभाग १ ब मधून रुपाली किशोर गारोळे ७१८ मते मिळवून विजयी झाली. प्रभाग २ अ मधून डॉ. दिपीका रविराज रहाटे (शिवसेना) ८९२ मते, आणि २ ब मधून शिवसेना(उ.बा.ठा.) च्या महेश शेषराव रिंढे १,००६ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग ३ अ मधून काँग्रेसच्या मंगला सुरेश मानवतकर ९६३ मते, आणि ३ ब मधून मुजीब हसन अ. हबीब कुरेशी यांनी ८५० मते मिळवून विजय मिळवला. प्रभाग ४ अ मधून काँग्रेसच्या जमनबाई पीरु गवळी १३५९ मते, ४ ब मधून काँग्रेसच्या मुजिब खॉ वली महमद खाँ १५३९ मते मिळवत यश संपादन केले. प्रभाग ५ अ मधून काँग्रेसच्या अंजुम बानो शेख अख्तर कुरेशी १,१७७ मते, आणि ५ ब मधून काँग्रेसच्या शेख महेबुब शेख जुम्मा गवळी हे १,१८७ मते मिळवून विजयी झाले.

प्रभाग ६ अ मधून शिवसेनेच्या नर्मदा सुरेश गायकवाड १,०७७ मते, ६ ब मधून ओमप्रकाश पांडूरंग सौभागे १,१६२ मते मिळवत विजयी ठरले. प्रभाग ७ अ मधून काँग्रेसच्या शबनूर बी शेख रईस कुरेशी १,५०६ मते, आणि ७ ब मधून मोहम्मद अलीम ताहेर यांनी १,८२४ मते मिळवून सदस्यपद पटकावले

प्रभाग ८ अ मधून शिवसेना (उ.बा.ठा.) च्या नितीन रमेश तुपे यांनी ९५८ मते, ८ ब मधून शिवसेनेच्या सरला मोहन जाधव १,०१७ मते मिळवून विजयी ठरल्या. प्रभाग ९ अ मधून काँग्रेसच्या सुनिता संजय ढाकरके ८०९ मते, ९ ब मधून वैभव गिरीश उमाळकर १,००० मते मिळवत यश संपादन केले. प्रभाग १० अ मधून शिवसेनेच्या अक्का बद्रीनाथ गायकवाड ९९३ मते, १० ब मधून कविता विशाल काबरा ७३० मते मिळवत विजयी ठरली. प्रभाग ११ अ मधून शिवसेना (उ.बा.ठा.) च्या विलास वैजीनाथ चनखोरे १,९८९ मते तर ११ ब मधून आफिया निसार अन्सारी या १,९०५ मते मिळवून विजयी ठरली

प्रभाग १२ अ मधून शिवसेनेचे सुरेश विश्वनाथ वाळुकर ८५८ मते, १२ ब मधून शिवसेनेच्या प्रिती प्रविण शिंगनाथ ६७६ मते मिळवत विजयी ठरले. प्रभाग १३ अ मधून शिवसेनेच्या रुपाली मनोज जाधव यांनी ७३२ मते तर १३ ब मधून काँग्रेसच्या निलीमा शरद सोमन या ६१० मते मिळवून विजयी झाल्या.

 

000

संबंधित पोस्ट

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस मान्यताØ आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभेØ मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

मुंबईत कबुतरांना खायला घालणाऱ्यांची आता खैर नाही, पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल, दादर कबुतरखान्याच्या तोडकामाला जमावाचा विरोध- -कबुतरांमुळे कोणालाही काहीही त्रास होत नाही. या भागातील बिल्डर्सची घरं विकली जात नाहीत. त्यामुळे कबुतरखाना हटवण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला. –

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· इंदू मिल येथील पुतळ्यासंदर्भात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

जिल्हा कृषी महोत्सवाचे कराड येथे 26 ते 30 डिसेंबर कालावधीत आयोजन*

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता- ‘टेक वारी’तील ज्ञानाचा नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी घेत आहेत ऑनलाईन लाभ

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न