vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

 

 सांगली, प्रतिनिधी: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, यांच्यासह आरोग्य व पोलीस यंत्रणांचे तालुकास्तरीय संबंधित अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणे, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे व सद्यस्थिती, जातीच्या दाखल्याची प्रलंबित प्रकरणे, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, तक्रारी, अत्याचार पीडितांना नुकसान भरपाई, गंभीर गुन्ह्यांतील पीडितांच्या वारसांचे पुनर्वसन आदिंचा आढावा घेतला.

 यावेळी बाळासाहेब कामत यांनी प्रलंबित प्रकरणे, मागील इतिवृत्त, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे याचा आढावा समितीसमोर दिला.

00000

संबंधित पोस्ट

प्रभू श्रीरामांनी सांगितलेल्या मूल्यांची जोपासना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

राज्याचे रत्ने व आभूषणे धोरण – २०२५ जाहीर राज्याच्या गुंतवणूक, औद्योगिक क्षेत्रासाठी झळाळी,एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, पाच लाख नवीन रोजगार निर्मितीचे उद्द‍िष्ट..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

एमएचटी-सीईटी 2025 पीसीएम ग्रुपची 5 मे रोजी फेर परिक्षा…

अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त

अतिदुर्गम भागात पोषण आहार व प्राथमिक आरोग्य सेवा३८ नवीन अंगणवाड्यांच्या माध्यमातून देणार- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे