vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी

सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी.

सातारा, प्रतिनिधी ऐतिहासिक सातारा नगरीत आज साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ (शाहू क्रीडा संकुल) येथे ध्वजारोहणाच्या मंगल सोहळ्याने या साहित्यकुंभाचा दिमाखदार शुभारंभ झाला. सातारा जिल्ह्याचे वैभव आणि साहित्याची परंपरा यांचा अनोखा संगम आज या ठिकाणी पाहायला मिळाला.

महाराष्ट्र साहित्य परिषदे, पुणे, शाखा-शाहूपुरी (सातार) आणि मावळा फौंडेशन, सातारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे 1 ते 4 जानेवारील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे सातारा येथे आयोजन करण्यात आले आहेमान्यवरांची मांदियाळी आणि ध्वजारोहण

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या ऐतिहासिक प्रसंगी ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाहक सुनीताराजे पवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, ज्येष्ठ उद्योजक भालचंद्र जोशी, संदीप शहा, रवींद्र बेडकीहाळ यांसह अनेक साहित्यिक, मान्यवर, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध ‘कट्ट्यांचा’ उत्साह,संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. हजारो पुस्तकांनी सजलेली ही ग्रंथनगरी वाचकांसाठी ज्ञानाचा खजिना ठरत आहे. साहित्याच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या विविध कट्ट्यांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले:

कवी कट्टयाचे उद्योजक भालचंद्र जोशी यांच्या हस्ते व रवींद्र बेडकीहाळ यांच्या उपस्थितीत तर गझल कट्टयाचे उद्घाटन समंलनाचे स्वागत अध्यक्ष श्री. भोसले यांच्या हस्ते झाले. प्रकाशन कट्टयाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले

संबंधित पोस्ट

प्रेस फोटोग्राफर निनाजी भगत, रविकिरण टाकळकर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ.गजेंद्र निकम यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

vishwatmaklokswamivarta

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश*  

विधान परिषद लक्षवेधी सूचना :चित्रपटांना सेन्सॉर करण्याचे अधिकार केंद्र शासनास- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा!२२ एप्रिल ते १ मे २०२५ या कालावधीत राज्यात विविध उपक्रम साजरे होणार – पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे

कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महोत्सव – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई शेती, संस्कृती आणि ग्रामीण पर्यटनाचा दि. १५ ते १७ एप्रिल २०२५ रोजी भव्य सोहळा

मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश ससून डॉक बाबत घेतली आढावा बैठक