vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मी मतदान करणार, तुम्हीही मतदान करा’, असे नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे सेल्फीव्दारे आवाहन

‘मी मतदान करणार, तुम्हीही मतदान करा’, असे नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे सेल्फीव्दारे आवाहन

 

     नवी मुंबई प्रतिनिधी-     सध्याच्या सोशल मीडियाप्रेमी युगात सेल्फी छायाचित्रे काढून समाज माध्यमांवर अपलोड करण्याची लोकांची आवड लक्षात घेऊन नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका मुख्यालयासह सर्व कार्यालये, निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये, विष्णुदास भावे नाट्यगृह, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच वंडर्स पार्क, सेंट्रल पार्क अशी उद्याने, रूग्णालये, मॉल्स, डी मार्ट सारखी वर्दळीची ठिकाणे येथे मतदानाविषयी जनजागृती करणारे सेल्फी बुथ उभारण्यात आले आहेत. या सेल्फी बूथवर नागरिक उत्साहाने छायाचित्रे काढत असून आपल्या समाज माध्यमांवर अपलोड करून इतरांनाही मतदानाचे आवाहन करीत आहेत.

     महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनीही मतदानाच्या सेल्फी बूथवर छायाचित्र काढून ‘मी मतदान करणार, तुम्हीही मतदान करा’, असे आवाहन नवी मुंबईकर नागरिकांना केले.

0000

संबंधित पोस्ट

आंध्रप्रदेशात कुर्नूल जिल्ह्यात आज पहाटे एका खासगी बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बस बंगळुरुहून हैद्राबादला जात होती.

vishwatmaklokswamivarta

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी-भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ विषयावर कार्यशाळा संपन्न                                          

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (CBN) ‘ऑपरेशन ब्लॅक हॉक्स’ अंतर्गत आंतरराज्य हेरॉईन तस्कर टोळीचा पर्दाफाश केला, 18.6 किलो कच्चे हेरॉईन जप्त आंतरराज्य टोळीच्या 3 प्रमुख सदस्यांना अटक

आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना- गृह राज्य मंत्री योगेश कदम

💐☘️*धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा* ☘️💐आज उत्साह, आनंद आणि रंगांची उधळण करणारा सण *रंगपंचमी* !

अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास निधी-उपलब्ध करुन देऊ- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta