vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

मतदानाचे आवाहन करणा-या मतदान यंत्राच्या मॅस्कॉटला नवी मुंबईकर नागरिकांची पसंती

मतदानाचे आवाहन करणा-या मतदान यंत्राच्या मॅस्कॉटला नवी मुंबईकर नागरिकांची पसंती

 

     नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या 15 जानेवारी रोजी होणा-या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये नवी मुंबईतील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा घटनेने दिलेला अधिकार बजावावा याकरिता व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून यावेळी प्रथमत:च चार सदस्यीय पॅनल पध्दतीने निवडणूक होत असल्याने मतदान कसे करायचे याविषयीही नागरिकांमध्ये माहिती प्रसारित केली जात आहे.

          निवडणूक विषयक माहिती प्रसारणाकरिता वेगवेगळया स्वरुपाच्या नाविन्यपूर्ण गोष्टींचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये मतदान यंत्र अर्थात इव्हीएम मशीनचा मॅस्कॉट तयार करण्यात आला असून हा मॅस्कॉट वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना भेटून त्यांना 15 जानेवारी रोजी मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. या मतदान यंत्राच्या मॅस्कॉटला नागरिकांकडून, त्यातही विशेषत्वाने मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महानगरपालिकेच्या वतीने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशाप्रकारे विविध कल्पक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर खाजगी क्लासेससाठी आदेश निर्गमित सकाळ-सायंकाळच्या सत्रात किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून क्लासेस घ्यावेत..

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासआवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ..

vishwatmaklokswamivarta

अमरनाथ यात्रेकरूंच्या नोंदणीत घट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये साकारणार भिंतीवरील पुस्तकालय

महाराजस्व अभियानातून शासकीय योजना लोकांच्या दारात – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके कोरपना येथे आयोजन ; लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप

आरोग्य शिबिरांतर्गत उपचार झालेल्या घरेलु कामगार महिलांचा आनंद सोहळा- दसऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी, डॉक्टरांना दिले आपटारूपी सोने- मोफत उपचाराबद्दल मानले जिल्हा प्रशासन, डॉक्टरांचे आभार..