vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम #‘ई-टपालवाला सेवा’जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हॉट्सअ‍ॅपवर नागरिकांना आता मिळणार जलद माहिती..

जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम #‘ई-टपालवाला सेवा’जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हॉट्सअ‍ॅपवर नागरिकांना आता मिळणार जलद माहिती..

नांदेड, प्रतिनिधी : राज्याचे मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या १५० दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हा प्रशासनाने नागरिकाभिमुख व अभिनव असा ‘ई-टपालवाला सेवा’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांच्या अर्जावर केलेल्या कार्यवाहीची माहिती थेट त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

या सेवेमुळे नागरिकांना कार्यवाही बाबतची माहिती मिळविण्यासाठी कार्यालयात वारंवार येण्याची गरज राहणार नाही. नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज अथवा पत्र सादर करताना त्यामध्ये स्वतःचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक नमूद करावा.यामुळे अर्जदारास त्यांनी मागितलेली माहिती घरबसल्या त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात प्रथमच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, केवळ मागील दोन दिवसांत १ हजार ५०० नागरिकांना या ई-टपालवाला सेवेद्वारे माहिती देण्यात आली आहे. तसेच आगामी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी नेमणूक करण्यात आलेल्या ५७७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांचे आदेश या ई-टपालवाला सेवेद्वारे थेट त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्यात आले आहेत.

लोकाभिमुख, पारदर्शक, जलद व कार्यक्षम प्रशासन देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, अधिकाधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.ही सेवा यशस्वीपणे कार्यान्वित करण्यासाठी आयटी कन्सल्टंट संतोष निलावार व मुख्यमंत्री फेलो आर्थव मोडक यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

०००००

संबंधित पोस्ट

भारत-यूके करारामुळे महाराष्ट्राला जागतिक व्यापाराच्या नव्या संधी मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारत-यूके मुक्त व्यापार कराराचा शुभारंभ

वॉकेथॉनमध्ये चालले हजारो नागरिक जलसंवर्धनाचा केला निर्धारपाण्याचा अपव्यय टाळून प्रत्येक थेंब जिरवा ; जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे

राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथाचा हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ• जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रसिध्दी मोहिमेची सुरुवात

बिहार निवडणूक आणि पोटनिवडणुका 2025: मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी-केरळचे माजी मुख्यमंत्री पी.विजयन यांच्या निवासस्थानासह संबंधीत १२ ठिकाणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाचे छापे सुरु…..

मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी पालकांच्या आत्मविश्वासाची जोडही आवश्यक – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके आदिवासी आश्रमशाळांमध्ये आता डिजीटल सुविधांची भर