vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

एपीएमसी मार्केटजवळील चेक पोस्टवर आचारसंहिता पथकाने पकडली 16 लाख 16 हजार रोकड

एपीएमसी मार्केटजवळील चेक पोस्टवर आचारसंहिता पथकाने पकडली 16 लाख 16 हजार रोकड

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-

  नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात प्रवेशाच्या तसेच मुख्य विविध 9 ठिकाणी दिवसाच्या तिन्ही सत्रांमध्ये 24 तासात 27 स्थिर संनिरीक्षण पथके (SST Team) स्थापन केलेली आहेत. या पथकांमार्फत वाहने व इतर बाबींवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येत आहे.

  महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार, आचारसंहिता कक्षाचे मुख्य सनियंत्रण अधिकारी श्री. सुनील पवार यांचे मार्गदर्शनाखाली, दि. 9 जानेवारी रोजी, दुपारी 12.30 वा. दरम्यान एपीएमसी मार्केट जवळील चेक पोस्टवर आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ.अमोल पालवे व परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी श्री.तुषार दौंडकर तसेच प्रशासकीय अधिकारी श्री.संजीव पवार यांच्या नियंत्रणाखाली एकूण रू. १६,१६,०००/ – इतक्या किंमतीची रोकड पकडण्यात आली आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.

#NMMC

संबंधित पोस्ट

बिनागुंडा परिसरात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त क्षेत्रभेट,जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर बिनागुंडा परिसरात योजनांच्या अंमलबजावणीला गती वनपट्टेधारकांना फार्मर आयडी, घरकुल व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन..

शाळांच्या परिसरात अपायकारक अन्नपदार्थ व कॅफिनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई – मंत्री नरहरी झिरवाळ

धनगर समाज आरक्षण मोर्चानिमित्त वाहतूक मार्गात बदल ..

vishwatmaklokswamivarta

रब्बी हंगाम 2025-26 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन1 ते 7 डिसेंबर – 10 वा “पीक विमा सप्ताह”गहू, हरभरा व रब्बी कांदा पिकांसाठी 15 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी संगणक आणि सौर ऊर्जा प्रशिक्षण

पडताळणीअंती नवी मुंबईत आढळले 13336 दुबार मतदार-दोनपैकी कोणत्या एका ठिकाणी मतदान करणार भरुन घेतले हमीपत्र

vishwatmaklokswamivarta