vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. जनकल्याणाच्या विविध योजना राबवितांना जनगणनेमुळे प्राप्त माहितीचा वापर केला जातो. अशा या जनगणनेचे काम हे कर्तव्य भावनेने करावे व आपला सक्रीय सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना केले.

जनगणना 2027 अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जनगणना कर्मचाऱ्यांचे घरयादी गणना करुन गट तयार करण्याबाबत प्रशिक्षण पार पडले. जिल्हाधिकारी कार्यालय, विविध शासकीय कार्यालये, नगरपालिका, तहसिल कार्यालये येथील कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला.

निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य संगिता राठोड, प्रशिक्षण देण्यासाठी आलेले जनगणना संचालनालयाचे सहा.संचालक प्रवीण भगत, जनगणना निरीक्षक अरुण साळगावकर, तज्ज्ञ व्यक्ती रामदास मंडाले आदी उपस्थित होते.

दोन टप्प्यात होणार जनगणना, जनगणना 2027 ही दोन टप्प्यात होत आहे. त्याती पहिला टप्पा घराची यादी तयार करुन त्याचे गट तयार करणे हा असून हा टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत पार पाडला जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष जनगणना फेब्रुवारी 2027 मध्ये सुरु होईल. यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही जनगणना ही संपूर्ण डिजीटल असेल. त्यात स्वगणनेचे म्हणजेच स्वतः नागरिकांना आपली माहिती ऑनलाईन भरता येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ओळखक्रमांक (आयडी) तयार होणार आहे. अर्थात ही भरलेली माहिती स्वतः जनगणना कर्मचारी येऊन पडताळणी ही करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयातील श्रीमती उर्मिला धारुरकर यांनी सूत्रसंचालन केले.

०००००

संबंधित पोस्ट

राष्ट्र्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न…

vishwatmaklokswamivarta

आधी शेतरस्ते खुले केले, आता गरिबांच्या लेकरांच्या शाळा समृद्ध करणार!-जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरणासाठी सतीश घाटगे यांचा पुढाकार.

गॅस सिलेंडर डिलीव्हरी करणाऱ्या व्यक्तींनी अतिरिक्त पैसे मागितल्यास कारवाई करण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या भरडधान्यांना आंतरराष्ट्रीय ओळख**‘कोया कृषी कुंभ २०२६’मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम*

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना प्रति थेंब अधिक पिक योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

vishwatmaklokswamivarta

🎖️ ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते मागांती मुरली मोहन यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर.