vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज करणार प्रबोधन

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज करणार प्रबोधन..

 

हिंगोली, प्रतिनिधी-: नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नऊ समाजासह इतरही भाविकांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती व्हावी, यासाठी चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोहरादेवी गडाचे महंत सुनीलजी यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले.

यावेळी नांदेड क्षेत्रिय समितीचे अशासकीय सदस्य अॅड. संतोष राठोड, हरनामसिंह चव्हाण, सतवतसिंह चव्हाण, राज्य समन्वयक तेजासिंह बावरी, रथ जिल्हा समन्वयक अंबादास दळवी, संतोष जाधव, मलकितसिंह भाटीया, दिलीप राठोड, डॉ. आकाश राठोड यांच्यासह समजाबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.चित्ररथासोबत पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज जिल्ह्यातील तांड्यांवर जावून समाज जनजागृती करणार आहेत. या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, हा मुख्य उद्देश आहे. हे दोन्ही रथ जिल्ह्यातील वस्ती, तांड्यांवर जावून ‘हिंद दी चादर’ या विशेष कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्‌ह्यात एक चित्ररथ आणि एक एलईडी रथाच्या माध्यमातून सिख – सिकलिगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाज या सर्व नऊ समाजामधील भाविकांमध्ये नांदेड येथे होणाऱ्या हिंद दी चादर या श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाची जनजागृती करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजबांधवांकडे विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

 

 

 

संबंधित पोस्ट

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण..मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी अथकपणे काम करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही,स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री यांनी केले अभिवादन..

vishwatmaklokswamivarta

कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात जनजागृती अभियान या विषयावर मुंबई येथे विशेष संवाद !वर्ष ७११ पासून सुरु असलेल्या जिहादच्या षडयंत्राविषयी हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी जनजागृती अभियान !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेच्या उपस्थित सतीश घाटगे यांचा भाजपात जाहीर प्रवेश-कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण..

vishwatmaklokswamivarta

150 दिवसीय ई – गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड परिक्षेत्र अव्वल मा. मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा सन्मान 

हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाच्या लढ्याला मोठे यश!*वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकातील संतांची नावे आणि आक्षेपार्ह भाग वगळण्याचे सेन्सॉर बोर्डाचे आदेश!नाटकाचे नाव बदलून सुधारित संहिता पुन्हा सादर करण्याचे सेन्सर बोर्डाचे निर्मात्यांना स्पष्ट निर्देश*

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी अर्ज करावेत