vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर…

 

मुंबई, प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ‘पाडू’ (प्रिंटींग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादा‍त्मकरित्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची मतदान यंत्रे केवळ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच वापरली जात आहेत. ही यंत्रे भारत निवडणूक आयोगाची असून ती ‘एम3ए’ या प्रकाराची आहेत. त्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी कंट्रोल यूनिटला (सीयू) बॅलेट यूनिट (बीयू) जोडूनच करावी, फक्त तांत्रिक अडचण आली तरच अत्यंत अपवादा‍त्मकरित्या पाडूचा वापर करावा, असे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी 140 पाडूंची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अत्यंत अपवादा‍त्मक परिस्थितीत मतमोजणीसाठी पाडूची गरज भासल्यास कंपन्याच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीत त्याचा वापर करावा. त्याचबरोबर पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखविले आहे.

 

000

संबंधित पोस्ट

मराठी भाषा विभागासह अधिनस्त कार्यालयांची सात संकेतस्थळे नव्या स्वरूपात कार्यान्वितनव्या संकेतस्थळांचा लाभ घेण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन

पंढरपूर यात्रेसाठी थेट आगार/गावांतून आषाढी एकादशी निमित्त खास बसेस उपलब्ध 

राज्यात वातावरणात बदल – गुलाबी थंडीचा जोर वाढणार

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट!१० वर्षांत काशी आणि मथुरा मुक्त होतील!- अधिवक्ता आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद

सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ साठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या संविधान बंगल्याचे उद्घाटन*नविन बांधलेल्या संविधान बंगल्याच्या गृहप्रवेश सोहळयात केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अनेक मान्यवरांकडुन शुभेच्छांचा वर्षाव*