vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रात भविष्यात आमचं सरकार येणार! नारायण राणे यांचा दावा.

महाराष्ट्रात भविष्यात आमचं सरकार येणार! नारायण राणे यांचा दावा…

[ प्रतिनिधी  : आगामी निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदावर निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, भविष्यात महाराष्ट्रात आमच सरकार येणार असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रा आजपासुन रत्नागिरीत सुरु झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही. आम्हीही सत्तेत येऊ, असं सांगतानाच आम्ही केंद्रात सत्तेत आहोत, असा गर्भित इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

भविष्यात भाजप-शिवसेना युती झाली तर काय? या प्रश्नावर उत्तर देताना नारायण राणे यांनी युतीचा निर्णय झालाच तर पक्ष सांगेल ते मला मान्य असेल असं स्पष्ट केलं.

सुशांतची हत्या झाली. दिशा सालियानची बलात्कार करून हत्या झाली. आरोपी नाही मिळाले. असे अनेक प्रकरणं आहेत. त्याचे खरे आरोपी नाही मिळाले. ते मिळणारही नाही, असं ते म्हणाले.

राणेंच्या पाठी लागू नका. नाही तर मी आता थोडंच बोलतोय, सर्वच बोलावं लागेल. ते परवडणार नाही. मी क्रिमिनिल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? मंत्री, आमदार, नगरसेवक शाखाप्रमुख कसं केलं? तेव्हा विरोध का केला नाही? असा सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे. साहेबांना जेव्हा अतिरेक्याकंडून धोका होता, साहेबांना जेव्हा मातोश्री सोडायला सांगितलं. तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असं ते म्हणाले.

संबंधित पोस्ट

ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठाणे दिवाळी मेळावा-कारागृह निर्मित वस्तू प्रदर्शन व विक्री उद्घाटन सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजर…

अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचे निधन; मुंबईतील वरळी येथे करण्यात येणार अंत्यसंस्कार…

हिंदू एकता यात्रेत जाताना द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात झाल्याची माहिती समोर, सुदैवाने कसली गंभीरिजा झाले नसल्याची माहिती अदा शर्मा ने दिली

मुंबई ते गोवा रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) बोट सेवा सुरु करण्याची योजना आखत आहे. खुद्य मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभाग मंत्री नितेश राणे यांनी याबाबतची घोषणा केली. 

सातारा जिल्हयातील वाई तालुकेतील मौजे मांढरदेव येथील श्री. क्षेत्र काळेश्वरी देवीची सन 2024 मधील यात्रा दिनांक 24, 25 व 26 जानेवारी,2024 मांढरदेव गड येथे पार पडणार

vishwatmaklokswamivarta