vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, महापौर महायुतीच्या घटकपक्षांच्या चर्चेनंतर होणार – श्रीकांत शिंदे

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, महापौर महायुतीच्या घटकपक्षांच्या चर्चेनंतर होणार – श्रीकांत शिंदे

 

ठाणे प्रतिनिधी-

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. त्यामुळं भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवासांपासून रस्सीखेच पाहायला मिळतेय. अशातच बुधवारी (21 जानेवारी) नवी मुंबईतील कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेकडून पाठिंबा देण्यात आला आहे.

मनसेचा शिवसेनेला पाठिंबा :बुधवारी (21 जानेवारी) कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात शिवसेनेचे 53 नगरसेवक याठिकाणी आपल्या गटाची नोंदणी करण्यासाठी आले होते. त्याचवेळी मनसे नेते राजू पाटील हे देखील आपले मनसेचे 5 नगरसेवक घेऊन याठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, राजू पाटील, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनसेकडून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं सांगण्यात आलं.

विश्वनाथ राणे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेच्या गटनेतेपदी नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळं प्रदीर्घ अनुभव आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असलेल्या विश्वनाथ राणे यांच्याकडे आता महापालिकेतील शिवसेनेची नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या 9 नगरसेवकांनी आपला गट स्थापन केला असून गटनेतेपदी उमेश बोरगावकर यांची निवड करण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर 62 हा बहुमताचा आकडा गाठणं महत्त्वाचं आहे. सध्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत. तर भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत. याशिवाय, शिवसेना (उबाठा) पक्षाचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक निवडून आलेत. मात्र, निकालानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाचे दोन नगरसेवक नॉट रिचेबल असून हे दोन्ही नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती.

संबंधित पोस्ट

विशेष लेख-उष्माघात (Heat Stroke)#उष्माघात 

नवी दिल्लीत 14 ते 27 नोव्हेंबर कालावधीत 44 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा· ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेसह जागतिक व्यापार,संस्कृती आणि नवकल्पनांचा भव्य उत्सव

vishwatmaklokswamivarta

पद्मश्री किसनराव बाबुराव हजारे (अण्णा) यांनी राळेगणसिद्धी येथे स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना सहभागाचे आवाहन केले

पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या अंगीकृत खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

या दिवाळीत प्रियजनांना भेट द्या फास्टटॅगचा वार्षिक पास

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार· जनसंवाद कार्यक्रमातंर्गत बठाण ग्रामस्थांशी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी साधला संवाद