vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात; ‘सामना’वर ‘प्रहार’ करणार; नारायण राणेंचा हल्लाबोल.

संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात; ‘सामना’वर ‘प्रहार’ करणार; नारायण राणेंचा हल्लाबोल.

प्रतिनिधी  :संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांना फक्त सेनेनं बोलायला ठेवलंय. पण त्यांच्याच वक्तव्यांमुळे शिवसेना खड्ड्यात जात आहे. माझ्या मुलांची बरोबरी त्यांनी करू नये. नाहीतर मलाही ‘सामना’तल्या लिखाणावर ‘प्रहार’ मधून उत्तर द्यावं लागेल, असा घणाघात केंद्रीय नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. ते आज कणकवलीत जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून संजय राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश आणि नितेश यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना राणे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. “माझ्या मुलांवर टीका करण्याआधी तुझ्या मालकाची मुलं काय करतात ते पाहा. माझी मुलं सुशिक्षीत आणि हुशार आहेत. त्यांची तुलना करण्याची काहीच गरज नाही. टीका करणं आता थांबवा नाहीतर मलाही ‘प्रहार’मधून प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करावी लागेल”, असं नारायण राणे म्हणाले.

 

संदुक कसली उघडताय? रोखठोक काय ते बोलातुम्ही कुंडल्यांची भाषा करत असाल तर आम्ही देखील संदुक उघडू, मग त्यातून काय काय बाहेर येईल याचा विचार करा, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना राणेंनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. “एवढे दिवस मी धू धू धुतोय तुम्हाला मग अजून शांत काय बसला आहेत. संदुक उघडायला कुणी थांबवलंय तुम्हाला? संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांच्या लिखाणाला जास्त कुणी महत्त्व देत नाही. ना सामनाचा संपादक, ना धड प्रवक्ता. त्यांना फक्त बोलायला जवळ ठेवलंय”, असं नारायण राणे म्हणाले.

संबंधित पोस्ट

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती नियंत्रण कक्षातून आढावा.महापालिका आयुक्त विभागीय आयुक्तांची दूरध्वनीवरून चर्चा बचाव आणि मदतकार्यासाठी राज्य प्रशासन आणि राज्य आपत्ती निवारण यंत्रणेनी सतर्क रहावे- उपमुख्यमंत्री अजित पवार

आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

vishwatmaklokswamivarta

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपास,वैज्ञानिक पध्दतीने, सक्षमतेने होण्यासाठी मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयसर बसचे लोकार्पण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया,चला आपण लोक न्यायालयाच्या मार्गाने जावूया.””राष्ट्रीय लोकअदालत” होणार ३ मार्च २०२४ रोजी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात लोकशाहीला हादरा देण्याची घटना घडल्याचं वृत्त समोर आल्यामुळं एखच खळबळ,राजीव सातव यांच्या पत्नीवर गंभीर हल्ला, जीवाला धोका म्हणत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta