vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया,चला आपण लोक न्यायालयाच्या मार्गाने जावूया.””राष्ट्रीय लोकअदालत” होणार ३ मार्च २०२४ रोजी

सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया,चला आपण लोक न्यायालयाच्या मार्गाने जावूया.””राष्ट्रीय लोकअदालत” होणार ३ मार्च २०२४ रोजी

 

 

 

 ठाणे, प्रतिनिधी:- मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे श्रीनिवास ब्रि. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे अंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्हयातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोग, शाळा न्यायाधीकरण, ऋण वसुली न्यायाधीकरण व इतर न्यायालयांमध्ये रविवार, दि. ०३ मार्च, २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता “राष्ट्रीय लोकअदालत’ चे आयोजन करण्यात आले आहे.

 

या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्व मा. न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे जी दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, वैवाहिक स्वरूपाची, १३८ एन. आय अॅक्ट (चेक संबंधीची) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसूली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगार विषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, विज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूली प्रकरणे तसेच दावा दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

 

सर्व पक्षकारांनी प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडविण्याकरिता व आपले दुरावलेले संबंध पुर्नस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा अवश्य लाभ घ्यावा व आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे किंवा संबंधित तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा. तसेच सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्याय सेवा सदन, पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर, ठाणे येथे प्रत्यक्ष येवून किंवा फोन नंबर ०२२-२५४७६४४१ द्वारे संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे श्री. श्रीनिवास ब्रि. अग्रवाल व ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. ईश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे.

 

000000000

संबंधित पोस्ट

महाज्योती’ देणार सावित्रीच्या लेकींना स्व-संरक्षणाचे धडे! केंद्र सरकारच्या स्पोर्ट्स-फिटनेस सेक्टर स्कील कौन्सिल सोबत ‘महाज्योती’चा करार..

vishwatmaklokswamivarta

देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर आहेत. त्यासाठी २०२५ साली दिल्लीतील रामलीला मैदानावर धम्मदीक्षेचा भव्य कार्यक्रम

शहीद बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात राज्य सरकारकडून सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यात ३४०६ प्रकरणे निकाली28 कोटी 48 लाखाहून अधिक रक्कम वसूल..

अविवाहित मातेचं मूलही आता भारताचा नागरिक, उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निर्देश