vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

औरंगाबादमध्ये भरदुपारी घडला थरार, आरोपीला अटक,१६ वर्षीय तरुणीची दारुड्या रिक्षाचालकाने केली छेडछाड; घाबरलेल्या मुलीने रिक्षातून उडी

औरंगाबादमध्ये भरदुपारी घडला थरार, आरोपीला अटक,१६ वर्षीय तरुणीची दारुड्या रिक्षाचालकाने केली छेडछाड; घाबरलेल्या मुलीने रिक्षातून उडी

औरंगाबाद प्रतिनिधी  : जालना रोडवरील मोंढा नाका सिग्नलवरून रिक्षात बसलेल्या १६ वर्षीय तरुणीची दारुड्या रिक्षाचालकाने छेडछाड केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने भरधाव रिक्षातून उडी घेतली. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेच्या पथकाने सायंकाळी आरोपीला बेड्या ठोकल्या.

आनंद अंबादास पहुलकर (५०) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. पीडित तरुणी रक्षाबंधनासाठी मामाच्या घरी आली होती. शनिवारी क्लासला जाण्यासाठी मामाच्या मुलाने तिला मोंढा नाका येथे आणून सोडले. तेथून ती ऑटोरिक्षात बसली व रामगिरी हॉटेलजवळ जायचे असल्याचे सांगितले. यावर तो म्हणाला, तुला तेथे सोडणार नाही, दुसरीकडे घेऊन जाणार आहे. लगेच मागे वळून त्याने तरुणीच्या डाव्या हाताला पकडण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या तरुणीने भरधाव रिक्षातून उडी घेतली. यात तिचे नाक, हनुवटी व कानाच्या पाठीमागे गंभीर दुखापत झाली.

तरुणीने उडी टाकल्यानंतर चालकाने रिक्षा थांबवली. त्यानंतर तो तिच्याकडे चालत आला. तरुणी ‘वाचवा वाचवा’ अशी मोठ्याने ओरडत दुसरीकडे पळत सुटली. घटनास्थळी अनेक रिक्षा थांबल्या. गर्दी जमू लागल्यानंतर चालक घटनास्थळावरून रिक्षा घेऊन पळून गेला. जखमी तरुणीला एका तरुणाने मदत करीत मामाला घटनास्थळी बोलावून घेतले. यानंतर तिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.तरुणी मोंढा नाक्याकडे पळून जाऊ लागली. तेवढ्यात सायकलवर जात असलेला नीलेश सेवेकर हा तरुण तिच्या मदतीला धावून आला. त्याने तरुणीला मी तुझा भाऊ आहे. काय झाले ते सांग, असे विचारले. तरुणीने भावाचा मोबाइल नंबर दिला.

तरुणीने उडी टाकल्यानंतर चालकाने रिक्षा थांबवली. त्यानंतर तो तिच्याकडे चालत आला. तरुणी ‘वाचवा वाचवा’ अशी मोठ्याने ओरडत दुसरीकडे पळत सुटली. घटनास्थळी अनेक रिक्षा थांबल्या. गर्दी जमू लागल्यानंतर चालक घटनास्थळावरून रिक्षा घेऊन पळून गेला. जखमी तरुणीला एका तरुणाने मदत करीत मामाला घटनास्थळी बोलावून घेतले. यानंतर तिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.तरुणी मोंढा नाक्याकडे पळून जाऊ लागली. तेवढ्यात सायकलवर जात असलेला नीलेश सेवेकर हा तरुण तिच्या मदतीला धावून आला.

 

संबंधित पोस्ट

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ नागरिकांची एनडीआरएफ कडून यशस्वी सुटका

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांची ‘शिव संवाद’ यात्रा, दुसरा टप्पा आजपासून सुरु

आज पासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कालावधीकरिता-भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे- जिल्हा परिषदेने योग दिनी साधला विश्वविक्रमी भक्तियोग- चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांच्यासह संयुक्त उपक्रम- ⁠जवळपास साडेपाच लाख योगप्रेमींचा सहभाग- ⁠एकाच वेळी तीन विश्वविक्रमांना गवसणी- ⁠वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद- ग्रामीण भागातून भरभरून प्रतिसाद…