vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कालावधीकरिता-भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे मनाई आदेश जारी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कालावधीकरिता-भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे मनाई आदेश जारी

 

 

 

रायगड प्रतिनिधी- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी पासून आचारसंहिता लागू झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत 150-ऐरोली, 151-बेलापूर, 188-पनवेल व 190-उरण या विधानसभा मतदार संघामध्ये दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

 

मतदान शांत, निर्भय व निःपक्षपाती वातावरणात पार पाडावे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी पासून दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक प्रकीया पूर्ण होईपर्यंत खालील कृत्यास मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

 

 

 

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील शस्त्र परवानाधारक यांना शस्त्र, अग्निशस्त्र सोबत बाळगण्यास मनाई करण्यात येत आहे. हा मनाई आदेश शासकीय कर्तव्यावरील पोलीस अधिकारी कर्मचारी व संरक्षण/सुरक्षेकामी नेमलेल्या तत्सम इसमास त्याचप्रमाणे दिर्घकालीन स्थायी कायदा, रूढी व परंपरा यानुसार शस्त्रास्त्रे बाळगण्यास हक्कदार आहे त्या समाजाचे व्यक्तींना लागू असणार नाही. तसेच छाननी समितीने ज्यांना सवलत दिलेली आहे त्या शस्त्र परवानाधारकांना हा मनाई आदेश लागू असणार नाही. ज्या परवानाधारकांना या आदेशान्वये छाननी समितीने सवलत दिलेली आहे त्या परवानाधारकांनी आपली शस्त्रे निवडणुकीच्या कोणत्याही कार्यक्रमा दरम्यान उदा. प्रचार, रोड शो, सभा व रॅली प्रसंगी जवळ बाळगू नये.

 

प्रत्येक शस्त्र परवानाधारकास आदेशापूर्वी नोटीस बजावणे शक्य नसल्याने कलम 163 (2) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे.

 

हा मनाई आदेश दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी 18.00 वा. पासून ते दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी 24.00 वा पर्यंत लागू राहील. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरूध्द भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

संबंधित पोस्ट

अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एफएसएसएआय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तपणे मुंबईतील 10000 स्ट्रीटफूड विक्रेत्यांना देत आहेत प्रशिक्षण

गेट ऑफ इंडिया जवळ समुद्रात प्रवासी बोट बुडाल्याची दुर्घटना- 13 प्रवासी मृत्युमुखी, 101 जणांना वाचवण्यात यश, मुख्यमंत्र्यांची पाच लाखाची मदत जाहीर आजही बचाव कार्य सुरू…

vishwatmaklokswamivarta

उर्वरित पीक विमा जुलै अखेरपर्यंत देणार; आतापर्यत 7 हजार कोटी विमा वाटप; राज्यात बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांची उपलब्धता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

वातावरण बदलांमुळे होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करावे- राज्यपाल रमेश बैस डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कार्य उल्लेखनीय

vishwatmaklokswamivarta

MSRTC च्या 5 हजार जुन्या बसेसचा होणार कायापालट; ऊर्जा कार्यक्षम आणि इको फ्रेंडली बसेस सुरू करण्यात येणार…

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 काय करावे व काय करु नये मार्गदर्शक सूचना जारी…

vishwatmaklokswamivarta