vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उर्वरित पीक विमा जुलै अखेरपर्यंत देणार; आतापर्यत 7 हजार कोटी विमा वाटप; राज्यात बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांची उपलब्धता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

उर्वरित पीक विमा जुलै अखेरपर्यंत देणार; आतापर्यत 7 हजार कोटी विमा वाटप; राज्यात बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांची उपलब्धता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

 

राज्य प्रतिनिधी

यावर्षी राज्यात विक्रमी पीक विमा वाटप करण्यात आला आहे. विविध पीक विमा कंपन्यांचे विमा नुकसान देण्याबाबतचे धोरण आणि होणारा विलंब याबाबत शेतकऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आहेत. पीक विमा योजनेला पर्यायी योजना आणण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे. ही समिती देशातील इतर राज्यांमध्ये राबवली जाणारी पीक विमा योजना तसेच ज्या राज्यांमध्ये पीक विमा योजनाच लागू नाही अशा राज्यांमध्ये शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने नुकसानीबाबत लाभ दिला जातो याचा अभ्यास करून अहवाल शासनास सादर करेल, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत दिली.

 

सन 2023 च्या खरीप हंगामात पावसाने झालेल्या नुकसानीपोटी अग्रीम 25 टक्के प्रमाणे पीक विमा वितरण करण्यात आले. याद्वारे राज्यात विक्रमी 7 हजार कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला. यापैकी 4 हजार कोटींपेक्षा जास्त विमा रकमेचे वितरण झाले असून उर्वरित रकमेचे वितरण सुरू आहे. अंतिम पीक कापणीनंतरचे पीक विम्याचे वितरणसुद्धा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल. राज्यात बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांची आवश्यक उपलब्धता आहे असेही मुंडे यांनी सभागृहात सांगितले

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील मतमोजणीची तालुकानिहाय ठिकाणे निश्चित

vishwatmaklokswamivarta

मुंबईत होणारी ‘वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांकडून परिषदेच्या तयारीची पाहणी

 राज ठाकरेंची आज पुण्यात धडाडणार तोफ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रथमच मुंबईबाहेर वर्धापन दिन : मनसे पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार

उत्तराखंडमध्ये ढगफुटी; दोघांचा मृत्यू, 5 जण बेपत्ता

दुग्ध व्यवसाय, गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षणास सुरुवात

सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी महत्वाकांक्षी सायबर सुरक्षा प्रकल्प- गृह राज्यमंत्री योगेश कदम