vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

 राज ठाकरेंची आज पुण्यात धडाडणार तोफ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रथमच मुंबईबाहेर वर्धापन दिन : मनसे पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार

 राज ठाकरेंची आज पुण्यात धडाडणार तोफ..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रथमच मुंबईबाहेर वर्धापन दिन : मनसे पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार…

 

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापन दिन साजरा होत असून, यानिमित्ताने पहिल्यांदाच मुंबईबाहेर वर्धापन दिनाचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बोलणार असून, स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांवर मनसेनं लक्ष्य केंद्रीत केलं असून गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे, अमित ठाकरेंसह नेत्यांकडून दौऱ्यावर दौरे सुरू आहेत. इतर महापालिका निवडणुकांबरोबरच राज ठाकरे यांनी पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात अनेक बैठका घेतल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा वर्धापन दिन पुण्यात होत आहे.

काय बोलणार राज ठाकरे?

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं लोकार्पण झालं. मात्र, काम पुर्ण झालेलं नसताना उद्घाटन करण्यात आल्याची बरीच चर्चा रंगली होती. त्यामुळे या मुद्दावर राज ठाकरे काय बोलणार हे महत्त्वाचं असणार आहे.

केंद्रीय यंत्रणांच्या धाडी, भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप

भ्रष्टाचार आणि घोटाळ्यावरून राज्यात कलगितुरा रंगला आहे. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकानंतर बरेच गौप्यस्फोट झाले होते. त्यावरून राज ठाकरेंनी बरेच उपस्थित केले होते. आता नवाब मलिक यांना अटक झालेली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. देंवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत खळबळजनक गौप्यस्फोट केले असून, मलिकांबद्दल राज ठाकरे काय बोलणार, याकडेही सगळ्याचं लक्ष असणार आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय क्रीडा दिन सोहळा मुलांनो भरपूर खेळा; पण मैदानावर…मोबाईलवर नव्हे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

काय चाललंय तुमचं? मी घाबरत नाही, टाका मला तुरुंगात; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान

श्री क्षेत्र धामणगाव देव येथील यात्रा महोत्सवात भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त दोन दिवसीय यात्रा महोत्सवाचे आयोजन; सुमारे ५० हजार भाविक येण्याचा अंदाज

vishwatmaklokswamivarta

गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो; हा आदर्श येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 करिता केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मागविले अर्ज.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे,दुर्घटनाग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी समोर आलेली आहे.

vishwatmaklokswamivarta