vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेची विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करीत अनधिकृत जाहिराती, बॅनर्स, होर्डींग्जवर कारवाई*

नवी मुंबई महानगरपालिकेची विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करीत अनधिकृत जाहिराती, बॅनर्स, होर्डींग्जवर कारवाई*

 

नवी मुंबई प्रतिनिधी  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी विविध माध्यमांतून प्रदर्शित करण्यात आलेल्या अनधिकृत जाहिराती हटविण्याची धडाकेबाज कारवाई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. यामध्ये 13 ते 16 ऑक्टोबर या 4 दिवसांच्या कालावधीत 4418 इतक्या मोठया संख्येने छोटे – मोठे अनधिकृत बॅनर्स व होर्डींग हटविण्यात आले आहेत.

 

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सदर मोहीम आठही विभाग कार्यालय स्तरावर युध्दपातळीवर राबविण्यात आलेली असून संबंधित विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या माध्यमातून शासकीय, सार्वजनिक व खाजगी अशा तिन्ही मालमत्तांवर तसेच जागांवर लावण्यात आलेल्या अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्यात आलेल्या आहेत.

 

यामध्ये बेलापूर विभागात 391, नेरुळ विभागात 1139, वाशी विभागात 444, तुर्भे विभागात 1005, कोपरखैरणे विभागात 571, घणसोली विभागात 350, ऐरोली विभागात 331, दिघा विभागात 187 अशा प्रकारे एकूण 4418 छोटे -मोठे बॅनर्स व होर्डींग स्वरुपातील अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्यात आल्या आहेत. याशिवाय सार्वजनिक भिंतींवरील चित्रे, लेखन, पोस्टर्स, पेपर्स, झेंडे, कमानी देखील हटविण्यात आल्या आहेत.

 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करताना विनापरवानगी अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली असून यापुढील काळात निवडणूक विभागाची रितसर परवानगी घेऊनच परवानगी दिलेल्या ठिकाणी मान्यता मिळालेल्या आकारात जाहिराती प्रसिध्द कराव्यात अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

[17/10, 9:59 pm] Swamiji: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कालावधीकरिता

 

सन 1951 चे कलम 33 (1) (प) प्रमाणे मनाई आदेश जारी

 

 

 

रायगडदि.17(जिमाका):- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी पासून आचारसंहिता लागू झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत 150-ऐरोली, 151-बेलापूर, 188-पनवेल व 190-उरण या विधानसभा मतदार संघामध्ये दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

 

विविध राजकीय पक्ष प्रचारासाठी झेंडे उभारणे, बॅनर्स, कापडी फलक, पोस्टर लावणे, नोटीसा चिटकविणे, घोषणा लिहिणे, कमान, पताका, कट आउट लावणे किंवा चिन्हे वापरतात त्यामुळे अनेक वेळा दो-या, काठया व तत्सम भाग रस्त्यावर आडवा येऊन रहदारीस अडथळा होतो. प्रचाराचे कालावधीत अशा किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार होते, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवुन सार्वजनिक शांततेचा भंग होऊ शकतो.

 

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जनजीवन सुरळीत राहण्यासाठी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था जोपासण्यासाठी तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सामाजिक तेढ निर्माण होवू नये याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील निवडणूक कार्यक्षेत्रात महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 (1) (प) अन्वये पुढीलप्रमाणे या आदेशाच्या तारखेपासून पोलीस स्टेशन हद्दीत ही निवडणूक प्रकिया संपेपर्यंतच्या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येत आहे.

 

कोणत्याही सार्वजनिक रस्ता व सार्वजनिक जागेवर रहदारीस अडथळा होईल किंवा उजेड व हवा निर्वेधपणे येण्यास प्रतिबंध होईल अशा रितीने बॅनर्स, फलक, पोस्टर्स, कटआउट्स, खांबावरर झेंडे, बोर्ड व बॅनर्स लावता येणार नाहीत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराने खाजगी इमारत, कंपाऊंड अथवा आवारात पोस्टर्स, झेंडे, बॅनर्स, कटआउट्स, कापडी फलक लावणे, नोटीसा चिटकविणे, घोषणा लिहिणे इत्यादीचा वापर करावयाचा असल्यास त्यांनी प्रथम जागा मालकाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. अशा लेखी परवानगीची छायांकीत प्रत स्थानिक पोलीस स्टेशन व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना 3 दिवसाचे आत देण्यात यावी, अशा रितीने खाजगी जागेवर लावलेले पोस्टर्स, झेंडे, बॅनर्स, कापडी फलक इत्यादींमुळे रहदारीस अडथळा होणार नाही, उजेड व हवा अडवली जाणार नाही हे पाहणे त्या उमेदवाराला बंधनकारक राहील.

 

हा मनाई आदेश दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी 18.00 वा. पासून ते दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी 24.00 वा पर्यंत लागू राहील. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

संबंधित पोस्ट

गणेशोत्सव हा राज्य महोत्सव शांततेत, सुरळीत आणि विनाअपघाती होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. -अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके

vishwatmaklokswamivarta

निधी आणणं हे काम काही सोपं नाही. मंत्रिमंडळाचा अजून विस्तार होणे बाकी असतांनाही आपल्या प्रयत्नांना यश आले आणि 67 कोटी रुपयांचा निधी आपल्याला मिळाला आहे. तूर्तास आपण आज चार रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ केला असला तरी हा कामांचा सिलसिला असाच सुरु राहील, असे मत आ. अर्जुनराव खोतकर

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला वेग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

मुंबई डी एन नगर वाहतूक : पोलिसाला फरफटत नेणाऱ्या कार चालकाला अटक

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)-राज्यातील ५६० गोशाळांच्या बँक खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण…

राज्यातील अनेक भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत.🌧️ रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून मुसळधार पावसाने किनारपट्टी भागात अतिवृष्टी…

vishwatmaklokswamivarta