vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

वातावरण बदलांमुळे होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करावे- राज्यपाल रमेश बैस डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कार्य उल्लेखनीय

वातावरण बदलांमुळे होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करावे- राज्यपाल रमेश बैस डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कार्य उल्लेखनीय

 

 

 

          मुंबई, प्रतिनिधी : डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. वाढती लोकसंख्या, सातत्याने कमी होत असलेले कृषिक्षेत्र व हवामानातील तीव्र बदल या पार्श्वभूमीवर कृषि विद्यापीठांना आगामी काळातील आव्हानांसाठी तयार राहावे लागेल तसेच वातावरण बदलांमुळे होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.

 

राज्यपाल श्री. बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत समारंभ झाला, त्यावेळी राजभवन येथून स्नातकांना संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.

 

देशात कुशल मनुष्यबळ आहे व लोकांना पारंपरिक शेतीचे ज्ञान आहे. या क्षमतांचा वापर करुन कृषि स्नातकांनी देशाला आत्मनिर्भर बनवावे व त्याहीपुढे जाऊन देशाला जगासाठी ‘अन्नधान्याचे कोठार’ बनवावे असे आवाहन त्यांनी केले.

 

मागील दहा वर्षात देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, त्यांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी, कृषि शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत असे सांगून राज्यात फलोत्पादन व फुलशेती उद्योगाला तसेच अन्नप्रक्रिया क्षेत्रात स्टार्टअप्स सुरु करण्यास बराच वाव असल्याचे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.

 

वाढती लोकसंख्या व औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर जल व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल तसेच मृदा गुणवत्ता सुधार व उत्तम बीजनिर्मिती याकडे देखील लक्ष द्यावे लागेल असे राज्यपालांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बालकांच्या हक्कासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा ‘बालस्नेही पुरस्कारा’ने गौरव

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी

राज्यात आजपर्यंत 1 कोटी 63 लाख 60 हजार पीकविमा अर्ज दाखल,लाखो शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीकविमा,आज विमा भरण्याचा अखेरचा दिवस – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीला उत्साहात सुरुवातप्रदर्शन आणि विक्री 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान सुरू राहणार

विधी व न्याय विभाग-तात्पुरत्या स्वरुपातील 16 अतिरिक्त न्यायालये,२३ जलदगती न्यायालयांना २ वर्षांची मुदतवाढ…

बॉलीवूड अभिनेता शहंशा अमिताभ बच्चन यांचे ट्विट सध्या सोशल मिडियावर व्हायरल …