vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज पासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवेदन

आज पासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवेदन

मुंबई, प्रतिनिधी :- सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता.वाळवा) शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात येणार आहे. याबाबत अनेक दिवसापासून या भागातील नागरिकांची मागणी आहे. ईश्वरपूर नामकरण करण्यास शासनाने मान्यता दिली असून तसा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात येत आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, गाव, शहर यांचे नाव बदलविण्याचे अधिकार केंद्र शासनास आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) चे नाव ईश्वरपूर करणेबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास राज्य शासनाच्या शिफारशीसह पाठवण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून या प्रस्तावात मान्यता मिळाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहराचे नामांतर ईश्वरपूर करण्यात येईल, असेही मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

०००

संबंधित पोस्ट

हिंद-की-चादर” कार्यक्रमानिमित्त नांदेड तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना २४ जानेवारी रोजी #सुट्टी जाहीर       #परीक्षा सुरू असलेल्या ठिकाणी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील

vishwatmaklokswamivarta

अक्षय्य तृतीयेला बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी किशन जावळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त भव्य नगर कीर्तन-सीबीडी बेलापूर ते ओवे मैदानापर्यंतचा परिसर भक्तीमय वातावरणात निघाला न्हावून,बोले सो निहाल’च्या जयघोषाने दुमदुमले खारघर…

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावासाठी टँकर मंजूर….

महावीर जयंतीला कत्तलखाने, मांसविक्री बंद