vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

राज्य प्रतिनिधी-

मुख्य सचिव राजेश कुमार यांचा अल्पपरिचय आणि त्यांनी आतापर्यंत भूषविलेली पदे :

मुख्य सचिव राजेश कुमार (भा.प्र.से. १९८८) यांचा जन्म ३ ऑगस्ट १९६५ रोजी झाला. २५ ऑगस्ट १९८८ रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असलेल्या राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेली आहे.

श्री.राजेश कुमार यांनी यापूर्वी सोलापूर येथे अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदापासून २४ जुलै १९८९ रोजी आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली. त्यानंतर सातारा येथे सहायक जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती येथे आदिवासी विकास अपर आयुक्त, धाराशीव जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खासगी सचिव, नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त, नवी मुंबई येथे एकात्मिक बालविकास आयुक्त, मंत्रालयात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव आदी महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले आहे.

00000⁰

संबंधित पोस्ट

ओढे-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे अतिवृष्टी उपाययोजनांवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी अच्युत मोरे यांची निवड

महिलांच्या सर्वसमावेशक सबलीकरणासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत- राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर- पीसीपीएनडीटी अंतर्गत धाडसत्र सुरू करा- बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करा- महिलांसाठी आवश्यक सोयी सुविधा द्या

vishwatmaklokswamivarta

आग्रा आणि पानिपत येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक  मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांवर अर्थसंकल्पात तरतूद

बीड जिल्ह्याचे नवे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार..

vishwatmaklokswamivarta

23 नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा राज्यभरातील 4 लाख 75 हजार 669 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ

vishwatmaklokswamivarta