vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

क्रीडा महोत्सवात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग-सुदृढ आरोग्यासाठी खेळ अत्यावश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव

क्रीडा महोत्सवात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग-सुदृढ आरोग्यासाठी खेळ अत्यावश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव

ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद ठाणे) – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन दि. ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी लोधा वर्ल्ड स्कूल, ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर, पलावा सिटी, कल्याण येथे उत्साहात पार पडले. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव व आरोग्य विभागातील युवा खेळाडू दशरथ शिंगळे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून करण्यात आले.

या दोन दिवसांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांमुळे परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी यावेळी केले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजाच्या धावपळीतून वेळ काढून शारीरिक स्वास्थासाठी खेळांची आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.

क्रीडा महोत्सवात सर्वोत्कृष्ट सांघिक कामगिरीबद्दल शहापूर तालुक्याला सर्वोत्कृष्ट संघाचा मान मिळाला. विविध स्पर्धांमधील विजेते पुढीलप्रमाणे –

कबड्डी पुरुष – शहापूर तालुका

कबड्डी महिला – कल्याण तालुका

खो-खो पुरुष – भिवंडी तालुका

खो-खो महिला – शहापूर तालुका

क्रिकेट पुरुष – मुरबाड तालुका

बॉक्स क्रिकेट महिला – भिवंडी तालुका

लंगडी – शहापूर तालुका

रस्सी खेच पुरुष – शहापूर तालुका

रस्सी खेच महिला – अंबरनाथ तालुका

व्हॉलीबॉल – शहापूर तालुका

विजेते संघांनी हलगीच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. या क्रीडा महोत्सवाचे नियोजन पंजाब नॅशनल बँक यांच्या सौजन्याने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पद्माकर लहाने, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर, प्रकल्प संचालक जलजीवन मिशन पंडीत राठोड, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे, सर्व तालुकास्तरीय गट विकास अधिकारी, विभाग प्रमुख तसेच मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो, बॉक्स क्रिकेट, लंगडी, रस्सीखेच, हॉकी, व्हॉलीबॉल यांसारख्या सांघिक खेळांसह महिला व पुरुषांसाठी १०० मीटर धावणे, गोळाफेक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, जलतरण अशा वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद अधिनस्त जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी तसेच शिक्षक वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्या शिर्के व मनोहर मडके यांनी प्रभावीपणे केले. क्रीडा महोत्सवामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह, एकजूट आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

०००

संबंधित पोस्ट

क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांना सूचना देण्याचे आवाहन

टेबल टेनिसच्या मैदानात जिल्हाधिकाऱ्यांची फटकेबाजी-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने खेळाडूंमध्ये संचारले नवचैतन्य 

भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने बेल्जियमविरुद्धच्या शानदार विजयाने युरोप दौऱ्याची सुरुवात केली.

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती क्रीडापीठाच्या क्रीडा प्रबोधिनींसाठी प्रवेश सुरू; 23 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ क्रीडा, कलागुणांची जोपासना आवश्यक- विभागीय आयुक्त पापळकर

हॉकी शताब्दी वर्षानिमित्त ७ नोव्हेंबरला देशभरात ४०० सामने आयोजित

vishwatmaklokswamivarta