vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

संविधान जागृती प्रश्नमंजुषा’ उपक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

संविधान जागृती प्रश्नमंजुषा’ उपक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या माध्यमातून राज्यातील इयत्ता आठवी वी ते पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधान विषयक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत www.yuvacareer.com या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया सुरू राहील, असे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.

हे प्रशिक्षण महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर व मुंबई यांच्या मार्फत मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये दिले जात आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळपर्यंत www.yuvacareer.com या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया सुरू राहील. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे, त्यांना प्रशिक्षणाचे वेळापत्रक वेळेत पोहोचविण्यात येईल. तसेच प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य असल्याची व परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना घटनात्मक कायद्याचा अभ्यासक्रम प्रमाणपत्र Certificate Course on Constitutional Law बार्टी, पुणे यांच्या मार्फत दिले जाईल.

सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र www.yuvacareer.com या संकेतस्थळावरुन ९ फेब्रुवारी २०२६ पासून प्राप्त करण्याची प्रक्रिया पार पाडावी. तसेच संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ अंतर्गत प्रशिक्षण सत्र संपल्यानंतर १ मार्च, २०२६ रोजी (रविवार) प्रॉक्टरिंग पद्धतीने मॉक टेस्ट आयोजित करण्यात येईल. या मॉक टेस्टद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेची संपूर्ण पद्धत समजावून दिली जाईल. या मॉक टेस्टचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.

पहिली परीक्षा रविवार, ८ मार्च, २०२६ रोजी घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा रविवार, १५ मार्च, २०२६ रोजी आयोजित करण्यात येईल.

संबंधित पोस्ट

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे   

जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.25 जानेवारी 2025 रोजी15 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘सनबर्न’ संस्कृतीला लगाम लावून तातडीने ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवा!

वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ अभ्यासक्रमांतर्गत तीर्थक्षेत्रातील सेवांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नाशिक कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेसाठी हजारो तरुण राहणार कार्यरत

vishwatmaklokswamivarta

बलात्कार आणि हत्येसारख्या अमानुष गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही. न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट करणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपले सरकार कटिबद्ध असून, अशा नरधमीवृत्तीच्या गुन्हेगारांविरोधात कठोरात कठोर कारवाई सुरूच राहील.-उपमुख्यमंत्री  सुनेत्राताई  अजित पवार