vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

सुरक्षित इंटरनेट दिवसानिमित्त पी.एन.पी. कॉलेज, अलिबाग येथे  विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रम संपन्न

सुरक्षित इंटरनेट दिवसानिमित्त पी.एन.पी. कॉलेज, अलिबाग येथे  विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रम संपन्न

 रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC), जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या वतीने सुरक्षित इंटरनेट दिवस निमित्त (09 फेब्रुवारी रोजी) पी.एन.पी. कॉलेज, अलिबाग येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला.

या व्याख्यान कार्यक्रमात दैनंदिन जीवनात इंटरनेटचा सुरक्षित वापर, सायबर फसवणूक, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, ऑनलाईन व्यवहारातील सुरक्षितता तसेच वैयक्तिक माहितीचे संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी निलेश लांडगे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सायबर सुरक्षेबाबत सखोल माहिती देत डिजिटल युगात जागरूक राहण्याचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानातून सायबर विश्वातील संभाव्य धोके व त्यावरील उपाययोजना समजून घेतल्या.

या कार्यक्रमास पी.एन.पी. कॉलेजचे प्राचार्य श्री. पोटे यांच्यासह राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे अभियंते निखिल पडते, विराज चांगे व योगेश कराड उपस्थित होते.

0000000

संबंधित पोस्ट

प्रकल्प ‘AI-सारथी’चा शुभारंभ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी एसआरटीएमयूचा अभिनव उपक्रम

‘आयुष’ची बहुभाषिक डिजिटल सेवा बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि डिजिटल इंडिया भाषिणी विभाग यांच्यात सामंजस्य करार

डिजिटल अरेस्ट आणि पेन्शन फसवणुकीविरुद्ध वासिंद पोलिसांचे कवच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जनजागृती उपक्रम

भारताच्या डिजिटल कौशल्य मोहिमेला गती देण्यासाठी “बढना है तो यहाँ जुडना है” या देशव्यापी मोहिमेचा, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी ‘एस आय डी एच’ या कौशल्य भारत डिजिटल केंद्राच्या माध्यमातून केला शुभारंभ

ग्राहक व्यवहार विभागाकडून भारतीय प्रमाणवेळेसंदर्भात नवे नियम अधिसूचित देशभरात भारतीय प्रमाणवेळ समान वेळ संदर्भ म्हणून निश्चित; नवे नियम 180 दिवसांनंतर लागू

विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी क्षमता बांधणी आराखडा महत्त्वाचा- अपर मुख्य सचिव व्ही. राधा