vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ला प्राधान्य देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन.

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ला प्राधान्य देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई प्रतिनिधी

मुंबई, प्रतिनिधी प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई ‘एमएमआर’ क्षेत्रातील महापालिकांनी पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.मेट्रो आणि लोकल प्रवासाला पूरक अशी ‘पॉड टॅक्सी’ सेवा ‘एमएमआर’मधील शहरांत सुरू करण्याबाबत सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. नागरिकांना ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ देण्यास महापालिकांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
नंदनवन येथे झालेल्या आढावा बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, आदी अधिकारी उपस्थित होत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रवाशांना घरापासून रेल्वे किंवा मेट्रो स्टेशनपर्यंत आणि तिथून गंतव्य स्थान हा टप्पा पार करण्यासाठी रिक्षा किंवा बसवर अवलंबून राहावे लागते. यासाठी होणारी गर्दी, तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पॉड टॅक्सी चालवण्याचे नियोजन करावे. यामुळे मेट्रोचा वापर वाढण्यास मदत होईल आणि रस्त्यांवरील खासगी वाहनांचा भार कमी होईल. हा प्रकल्प राबवण्यासाठी ‘एमएमआरडीए’ची मदत घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले
महापालिकांनी आपल्या विकास आराखड्यात लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून इंधन बचतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

०००

संबंधित पोस्ट

कुणबी जात प्रमाणपत्रःनागरिकांना मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिकस्तरावर शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख- सभापती प्रा.राम शिंदे,पाटणा पीठासीन अधिकारी परिषदेत विचारमंथन..

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर-पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण 

vishwatmaklokswamivarta

सटवाई तांड्याच्या रहिवाशांच्या हक्कांसाठी मनसे आक्रमक; जागा नियमितीकरण, घरकुल मंजुरीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरच्या कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात

vishwatmaklokswamivarta