vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महापारेषणची सहाय्यक अभियंता (स्थापत्य) परीक्षा शांततेत व सुरळीत राज्यातील १११ केंद्रांवर १५ हजारांहून अधिक उमेदवारांची उपस्थिती

महापारेषणची सहाय्यक अभियंता (स्थापत्य) परीक्षा शांततेत व सुरळीत

राज्यातील १११ केंद्रांवर १५ हजारांहून अधिक उमेदवारांची उपस्थिती

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) अंतर्गत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठीची लेखी परीक्षा आज रविवारी राज्यातील १११ परीक्षा केंद्रांवर शांततेत व सुरळीत पार पडली. एकूण १३४ रिक्त पदांसाठी आयोजित या परीक्षेस २३ हजार ३३६ अर्जदारांपैकी तब्बल १५ हजार ५४१ उमेदवारांनी हजेरी लावली.

ही परीक्षा सकाळी ९ ते ११ या वेळेत घेण्यात आली. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, अमरावती, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, चंद्रपूर आदींसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील केंद्रांवर परीक्षा निर्विघ्नपणे पार पडली. सर्व केंद्रांवर आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्रवेशपत्र व ओळखपत्रांची काटेकोर तपासणी, सीसीटीव्हीद्वारे देखरेख, व्हिडिओग्राफी तसेच कडक सुरक्षा व्यवस्था यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता व शिस्त अबाधित राखण्यासाठी केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांनी विशेष दक्षता घेतली.

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांनी परीक्षेचे काटेकोर नियोजन केले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी केंद्रनिहाय आढावा घेत परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण केली.

परीक्षेदरम्यान केंद्राच्या 100 मीटर परिसरात अनधिकृत जमावबंदी लागू करण्यात आली होती. परीक्षा केंद्रात विनापरवानगी प्रवेश, तसेच उमेदवारांना कोणतेही लिखित साहित्य किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण बाळगण्यास सक्त मनाई होती. पोलिस बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित असूनही महापारेषणच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे संपूर्ण राज्यात परीक्षा शांततेत, पारदर्शक आणि यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती महापारेषणतर्फे देण्यात आली.

 

000

संबंधित पोस्ट

राज्यपालांची वझ्झर अनाथ आश्रमास भेट

vishwatmaklokswamivarta

एमएसआरडीसी’च्या द्रुतगती महामार्गांमुळेराज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम होणार- सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षेची अधिसूचना प्रसिध्द…

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 मतदान केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी…

vishwatmaklokswamivarta

जालना शहर महानगरपालिका मार्फत जालना शहरातील दिनांक 07 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी अकरा वाजेपर्यंत सार्वजनिक श्री गणेश मंडळाच्या 290 गणेश मूर्तींचे महापालिकेमार्फत श्री छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंड येथे विसर्जन

vishwatmaklokswamivarta

अति.वाळूज औद्योगिक वसाहत भूसंपादन;जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची बैठक