vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यापरदेशात देश

भारत आणि ब्राझील दरम्यान टपाल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी

भारत आणि ब्राझील दरम्यान टपाल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी..

नवी दिल्ली प्रतिनिधी-भारत आणि ब्राझील यांनी टपाल क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. टपाल सेवा, डिजिटल रूपांतरण आणि सर्वसमावेशक सेवा वितरण क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

भारत सरकारचे दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे आणि ब्राझीलचे दळणवळण मंत्री महामहिम फ्रेडेरिको दे सिक्वेरा फिल्हो यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या ब्राझीलच्या संघराज्य प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष महामहिम लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्या राजकीय भेटीदरम्यान स्वाक्षरी करून हा सामंजस्य करार औपचारिक केला.

या कराराद्वारे भारताचे टपाल विभाग आणि ब्राझीलचे दळणवळण मंत्रालय यांच्यात टपाल क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी आणि ज्ञान देवाणघेवाण वृद्धिंगत करण्यासाठी सर्वसमावेशक सहकार्याचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.भारत आणि ब्राझील दरम्यान टपाल क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे आणि फ्रेडेरिको दे सिक्वेरा फिल्हो यांच्यात कागदपत्रांची देवाणघेवाण.)

या सामंजस्य करारानुसार पुढील क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यात येणार आहे:टपाल क्षेत्रातील धोरणे आणि कार्यप्रणाली याबाबत सर्वोत्तम पद्धती व तज्ज्ञतेची देवाणघेवाण,सार्वत्रिक सेवा बळकटीकरण आणि पत्ता प्रणाली सुधारणा

डिजिटल रूपांतरण, ई-कॉमर्स लॉजिस्टिक्स आणि टपाल वित्तीय सेवांमध्ये सहकार्यक्षमता विकास, प्रशिक्षण आणि तांत्रिक देवाणघेवाणपरस्पर हिताच्या संयुक्त उपक्रम आणि धोरणात्मक प्रकल्प,जागतिक टपाल संघ (यूपीयू) सहित बहुपक्षीय मंचांमध्ये अधिक समन्वय,सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी दक्षिण-दक्षिण सहकार्याला प्रोत्साहन,हे सहकार्य दोन्ही देशांतील अधिकारी व तज्ज्ञांच्या परस्पर भेटी, संयुक्त कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन तसेच संरचित माहिती देवाणघेवाण यांद्वारे अंमलात आणले जाईल.

हा सामंजस्य करार टपाल प्रणालीचे आधुनिकीकरण आणि आर्थिक विकास, वित्तीय समावेशन तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा वितरणासाठी त्यांच्या नेटवर्कचा उपयोग करण्याच्या भारत आणि ब्राझीलच्या सामायिक बांधिलकीचे प्रतिबिंब आहे.भारत मोठ्या प्रमाणातील टपाल रूपांतरणाचा आपला अनुभव, ज्यामध्ये डिजिटल सेवा, ई-कॉमर्स वाहतूक व वितरण व्यवस्था आणि नागरिक-केंद्रित सार्वजनिक सेवा वितरण यांचा समावेश आहे, ब्राझीलसोबत सामायिक करणार आहे. वेगाने बदलणाऱ्या बाजारपेठीय वातावरणात टपाल परिचारकांची आर्थिक शाश्वतता आणि कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे.

हा सामंजस्य करार प्रारंभी पाच वर्षे कालावधीसाठी लागू राहील आणि स्वयंचलित नूतनीकरणाची तरतूद त्यात आहे. दोन्ही देशांच्या कायदे व नियमांनुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल.या सहकार्यामुळे वाढत्या भारत–ब्राझील धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकटी मिळेल आणि दक्षिणेकडील विकसनशील राष्ट्र यांच्यामधील महत्त्वाचे भागीदार म्हणून दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उल्हास वैतरणा कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन

मराठवाड्यातील अतिवृष्टीने बाधीत शेतकर्‍यांना मदतीची मागणी करणार्‍या हंबर्डा मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा !: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर,बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार,बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे..

vishwatmaklokswamivarta

पोलीस अंमलदारांना गुन्हे तपास प्रशिक्षणामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत- पोलीस अधीक्षक संदीप घुगे- 471 पदवीधर पोलीस अंमलदारांच्या गुन्हे तपास प्रशिक्षणाची सांगता

vishwatmaklokswamivarta

खरपुडी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta