vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अचानक परीक्षा केंद्रावर

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अचानक परीक्षा केंद्रावर

        छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) केंद्रास आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष दिलीप स्वामी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. आज इयत्ता १२ वीचा अर्थशास्त्र या विषयाचा पेपर होता.

 सिडको येथील पद्मश्री वसंतदादा पाटील उच्च माध्यमिक विद्यालय व न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, चिकलठाणा या दोन परीक्षा केंद्रांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी परीक्षा संचालनाची संपूर्ण प्रक्रिया, परीक्षा दालनातील शिस्त, आसनव्यवस्था, गोपनीयता आणि पारदर्शकता यांचा सविस्तर आढावा घेतला. केंद्रांवर कार्यान्वित असलेली सीसीटीव्ही यंत्रणा, त्याची स्टोरेज व्यवस्था तसेच नियंत्रण प्रणालीची तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना पुरेसा उजेड, हवा व पिण्याचे पाणी याची व्यवस्था उपलब्धता याबाबत पाहणी केली. उत्तर पत्रिका सोडविण्यासाठी असलेले शांतता व एकाग्रतेचे वातावरण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

०००००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग नोंदवावा – पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

राज्य विधानसभा पोटनिवडणुका | दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे मतदान टक्केवारी 📊बारामती (महाराष्ट्र) – 31.91% राहुरी (महाराष्ट्र) – 29.67%दुपारपर्यंत मतदान

गोसेवा आयोग पुरस्कारासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

रुग्णांना दर्जेदार सेवा द्या – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी जुलै ते डिसेंबर-तालुकानिहाय शिबीर दौरा कार्यक्रम जाहीर

तळागाळातील लोकांना कायद्याच्या माहितीसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आवश्यक – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रजिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक जनजागृती मोहीम