vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा गौरव – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा गौरव – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई, प्रतिनिधी : महिलांचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहभाग वाढवून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच विविध क्षेत्रांत समान संधी उपलब्ध करून देणे यासाठी महिला व बालविकास विभाग कार्यरत आहे. विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केलेल्या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र” हा विशेष सन्मान सोहळा ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे

हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचीही उपस्थिती असणार आहे. तसेच राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विशेष उपस्थिती असेल.

या कार्यक्रमाला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात अनाथ प्रमाणपत्र प्राप्त महिला, बालगृहात राहिलेल्या महिला, शक्ती सदन, निरीक्षण गृह, महिला आश्रम व महिला वसतिगृहातील महिला तसेच अंगणवाडी सेविका अशा विविध घटकांतील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उल्लेखनीय यश संपादन केलेल्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. या महिलांनी समाजात प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून त्यांच्या कार्याचा सन्मान करून इतर महिलांनाही प्रेरणा देण्याच उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील   – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण- जिल्हा वार्षिक योजनेतून बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’- विभागीय आयुक्त नयना गुंडे• विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन

सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ साठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रम; शहाजीराजे भोसले जयंतीनिमित्त‘स्वराज्य संकल्प महोत्सवाचे सोमवारी (दि.२७) भव्य आयोजनलोककलावंतांच्या सादरीकरणातून स्वराज्य संकल्पाचा प्रेरणादायी इतिहास उलगडणार…

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेशासाठी युवकांनी अर्ज करावेत

अमरावती जिल्ह्यातील मजिप्रा, जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या- मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश