vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अमरावती जिल्ह्यातील मजिप्रा, जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या- मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्यातील मजिप्रा, जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या- मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

 

            मुंबई, प्रतिनिधी : अमरावती जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये विविध गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यातील २३ गावांना पाण्याचे स्त्रोत जवळ नसल्याने १५ किमीवरून पाणी आणावे लागते. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशनमधील प्रलंबित कामांना गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

       मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अमगोथू रंगानायक, उपसचिव मंत्रा मानकामे, मजिप्राचे अधीक्षक अभियंता अजय सिंह, मजिप्राचे अमरावतीचे अधीक्षक अभियंता संतोष गव्हाणकर, कार्यकारी अभियंता विवेक सोळंके, अमरावती जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता स्नेहा धावडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तर अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

  मंत्री पाटील यांनी सांगितले की, चिखलदऱ्याच्या ग्रामीण भागातील ३६ गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा होतो, ही गंभीर बाब आहे. मजिप्रा, जलजीवन मिशन योजना निधीअभावी रखडू देवू नका. दुर्गम भागातील पाणीपुरवठ्याला प्राधान्य द्या. मेळघाटातील योजना आदिवासी आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेवून जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. अचलपूर आणि चांदूरबाजार भागातील काही गावे पादेशिक पाणीपुरवठा योजनांमधून सुटलेली आहेत. गावांच्या मागणीनुसार सद्य:वस्तुस्थितीचे पुन्हा सर्वेक्षण करून १५ दिवसात अहवाल सादर करावा, त्यानंतर त्या गावांचा मजिप्रा योजनेत समावेश करावा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले

  अचलपूर तालुक्यातील २४ गावातील जलजीवन मिशनची ८० टक्के; तर चांदूरबाजारमधील कामे ९८ टक्के पूर्ण झाली आहेत. यामधील ८३ गावात पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र ८ ते १० गावात योजना पूर्ण होवूनही पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याचे स्त्रोत जवळचे शोधण्याऐवजी दूरचे शोधून पाणीपुरवठा करण्याच्या सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या.

     मजिप्राच्या योजना त्वरित पूर्ण करून काही गावांचे स्थलांतर थांबवावे. आदिवासी, दुर्गम भाग, व्याघ्र प्रकल्प याबाबतच्या अडचणी समजून केंद्राच्या निधीची वाट न पाहता राज्य शासनाने उपाययोजना करण्याची मागणी आमदार श्री. कडू यांनी केली.

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आज 30 जून ते 1 जुलै 2025 या कालावधीत उत्तर प्रदेश (बरेली आणि गोरखपूर)ला भेट देतील.

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते महारेशीम अभियानाची सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

निर्यातवाढीसाठी तालुकास्तरीय मेळावे घ्यावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा निर्यात प्रचालन समितीची बैठक संपन्न- ज्येष्ठ कृषि तज्ज्ञ नानासाहेब पाटील यांनीही केले मोलाचे मार्गदर्शन- निर्यात वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल – मुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

भारताने जगाला दिलेले आरोग्याचे अनमोल वरदान म्हणजे योग – केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वतीने ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे योगाभ्यास कार्यक्रम

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक ! उज्जैनच्या संतांच्या मागणीला मंदिर महासंघाचा जाहीर पाठिंबा ,गोमांस खाणारे व मूर्तीपूजा न मानणारे यांना मंदिरात प्रवेशबंदी करा ! – मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta