
जागतिक महिला दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा
नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनी आयोजित विशेष समारंभ विष्णुदास भावे नाटयगृह वाशी येथे जल्लोशात संपन्न झाला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट सादरीकरण केलेल्या महिला कला समुहांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सुरु झालेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर बहरत गेला. स्पर्धांमधील विजेत्या महिला कलावंत समुहांचा विशेष सत्कार या प्रसंगी संपन्न झाला. त्याचप्रमाणे स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केलेली महिला संस्था तसेच महिला उद्योजक यांनाही विशेष पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये घणसोली येथील हॉटेल राधाराणी थाळीघर च्या संचालिका श्रीम.मंदा भिवसेन उंडे यांना महिला उद्योजकता पुरस्कार तसेच स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कार्य करणा-या नुतन सहकारी सेवा संस्था, कोपरखैरणे यांना स्वच्छतेविषयी उत्तम सेवा कार्य करणारी स्वयंसेवी संस्था / बचत गट म्हणून विशेष पुरस्कार प्रदान करीत सन्मानित करण्यात आले.
नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील तसेच बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, उपमहापौर श्री.दशरथ भगत, स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील, सभागृह नेते श्री.सागर नाईक, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम.सलुजा सुतार व उपसभापती तथा ब प्रभाग समिती सभापती श्रीम.रूपाली भगत, क प्रभाग समिती सभापती श्री.प्रकाश मोरे, इ प्रभाग समिती सभापती श्रीम.चंद्रभागा मोरे, फ प्रभाग समिती सभापती श्रीम. ललिता मढवी, जी प्रभाग समिती सभापती श्रीम.हेमांगी सोनवणे, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, विधी समिती सभापती श्रीम.सायली शिंदे, तसेच नगरसेविका श्रीम.अंजनी भोईर, श्रीम. स्वाती गुरखे, श्रीम.स्वप्ना गावडे, श्रीम.शुभांगी पाटील, श्रीम.गंगाताई पाटील, श्रीम.रेखा म्हात्रे, श्रीम.संतोषी म्हात्रे, श्रीम.सुरेखा नरबागे, श्रीम.अंजना म्हात्रे, श्रीम.माधुरी हरिजन, श्रीम.मिनाक्षी पाटील, श्रीम.ऐश्वर्या सोनावणे, श्रीम.दीक्षा कचरे, श्रीम.वैष्णवी नाईक, श्रीम.अदिती नाईक, श्रीम.ऐश्वर्या मढवी, परिवहन सदस्य श्रीम.राजश्री कातकरी, श्रीम.शितल भोईर, माजी नगरसेविका डॉ. गौतमी सोनावणे, श्रीम. उषा भोईर, श्रीम.वैजयंती भगत, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.संजय शिंदे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8 प्रशासकीय विभागातील उत्कृष्ट आशा सेविका श्रीम. ऋतुजा सुर्वे (बेलापूर करावे), श्रीम. रंजीता घरत (नेरुळ शिरवणे), श्रीम. सरला औचरमल (वाशीगाव), श्रीम. विद्या आहेर (तुर्भे सानपाडा), श्रीम. सुवर्णा पिलाने (कोपरखैरणे पावणे), श्रीम. शुभांगी देवकर (घणसोली नोसिलनाका), श्रीम. अनिता शेलार (ऐरोली), श्रीम. पुनम राउुत (दिघा) यांना सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे 8 महिला स्वच्छताकर्मी श्रीम. संगिता कोळी (बेलापूर), श्रीम. रेखा कडू (नेरुळ), श्रीम. अस्मिता तांबे (वाशी), श्रीम. आशा हंकारे (तुर्भे), श्रीम. नमिता भिवे (कोपरखैरणे), श्रीम. लक्ष्मी बिराडे (घणसोली), श्रीम. वंदना पाटील (ऐरोली), श्रीम. कमलाबाई मानवते (दिघा) या स्वच्छता सखींचाही विशेष सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे श्रीम.स्नेहा राजेंद्र घोरपडे यांना उत्कृष्ट महिला पोलीस कर्मचारी, तसेच श्रीम. नेहा विलास मनुचारी यांना उत्कृष्ट प्राथमिक शिक्षिका व श्रीम. विजया ठाकूर यांना उत्कृष्ट माध्यमिक शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक स्पर्धांचाही पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
समुह गायन स्पर्धा,प्रथम – सोबती महिला मंडळ, तुर्भे,व्दितीय – स्वराली ग्रुप, तुर्भेतृतीय – स्वरगंधा म्युझिक ग्रुप, नेरुळ,उत्तेजनार्थ – विठ्ठल रुक्मिणी महिला मंडळ, ऐरोली
महिला भजन गायन स्पर्धा
प्रथम – श्री विश्वेश्वर महिला भजनी मंडळ, ऐरोली
व्दितीय – स्वरगंधा भजनी मंडळ, वाशी
तृतीय – श्री गणेश भजनी मंडळ, दहिसर
उत्तेजनार्थ – जागृतेश्वर महिला भजनी मंडळ, वाशी
समूहनाटिका स्पर्धा,प्रथम – पंचशिल महिला मंडळ, नेरुळ,व्दितीय – फुलोरा ग्रुप, ऐरोलीतृतीय – रुचिरा ग्रुप, ऐरोली
लहान व्हिडीओ (Short Video) स्पर्धाप्रथम – अनिता पाटील, नेरुळव्दितीय – शबाना खान, कोपरखैरणेतृतीय – वर्षा गोरे, वाशी
समुह नृत्य स्पर्धा (वयोगट 18 ते 40)प्रथम – महिला उत्कर्ष मंडळ, घणसोलीव्दितीय – आदिशक्ती ग्रुप, ऐरोलीतृतीय – सखी ग्रुप, दिघाउत्तेजनार्थ – पॉवर ऑफ गर्ल, वाशी
समुह नृत्य स्पर्धा (वयोगट 40 वर्षाच्या पुढे)प्रथम – रुचिरा ग्रुप ऐरोलीव्दितीय – शालिनी ज्येष्ठ नागरिक संघ, वाशी
तृतीय – नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.33 पावणेगाव, कोपरखैरणे
उत्तेजनार्थ – मेघमल्हार ग्रुप, घणसोली
मंगळागौर स्पर्धा
प्रथम – रुचिरा ग्रुप ऐरोली
व्दितीय – आदिशक्ती ग्रुप ऐरोली
तृतीय – वाशीचा राजा महिला ग्रुप, वाशी
उत्तेजनार्थ – स्वामिनी महिला मंडळ, वाशी



