vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

नांदेड प्रतिनिधी :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून . बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी मंगळवार 10 मार्च 2026 सकाळी 10 वा. पासून कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी यांच्या येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दुरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

देशात सोन्याच्या खरेदीत तुफान वाढ; सोन्याच्या मागणीत 43 टक्क्यांनी वाढ…

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना;प्रस्ताव मागविले

पोस्टाची नवीन पार्सल पॅकेजिंग सुविधा नागरिकांच्या सेवेत

महाराष्ट्राच्या दालनाने राष्ट्रीय राजधानीत राज्याचा ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक उद्योगशक्ती अधोरेखित – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड

vishwatmaklokswamivarta

शिपिंग, लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योग वृद्धीसाठी सहकार्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात-२११७ पैकी १४३७ उमेदवारांची प्राथमिक निवड

vishwatmaklokswamivarta