vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यातंत्रज्ञान

डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने पी 8-आय विमानातून स्वदेशी ‘एडीसी-150’ एअर ड्रॉपेबल कंटेनरच्या घेतल्या यशस्वी चाचण्या

डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने पी 8-आय विमानातून स्वदेशी ‘एडीसी-150’ एअर ड्रॉपेबल कंटेनरच्या घेतल्या यशस्वी चाचण्या..

 

नवी दिल्ली प्रतिनिधी-संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे स्वदेशी ‘एडीसी-150’ म्हणजेच, एअर ड्रॉपेबल कंटेनरच्या चार यशस्वी इन-फ्लाइट रिलीज चाचण्या पूर्ण केल्या. या चाचण्या 21 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 दरम्यान गोव्याच्या किनाऱ्यालगत पी 8-आय विमानातून विविध प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये घेण्यात आल्या. स्वदेशी बनावटीच्या या एअर ड्रॉपेबल कंटेनरची क्षमता, 150 किलोग्रामपर्यंतचा पेलोड वाहून नेण्याची आहे. हा एअर ड्रॉपेबल कंटेनर समुद्रात दूरवर तैनात असलेल्या नौदलाच्या जहाजांना बिकट परिस्थितीत महत्त्वाचे साहित्य, उपकरणे, वैद्यकीय मदत जलद गतीने पोहोचवू शकतो. त्यामुळे नौदलाच्या कार्यात्मक लॉजिस्टिक्स क्षमतेत मोठी वाढ होईल.

विशाखापट्टणम येथील नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा ही या उपक्रमासाठी नोडल प्रयोगशाळा आहे. आग्रा येथील एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट यांनी या कंटेनरसाठी पॅराशूट सिस्टम विकसित केली आहे, तर बंगळुरू येथील सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्दिनेस अँड सर्टिफिकेशन यांनी त्यासाठी उड्डाण परवानगी आणि प्रमाणन प्रदान केले आहे. हैदराबाद येथील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी यांनी चाचण्यांसाठी उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.

भारतीय नौदलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, पी 8-आय विमानासाठी एडीसी-150 प्रणाली अगदी कमी कालावधीत विकसित आणि सक्षम करण्यात आली. सर्व डेव्हलपमेंटल फ्लाइट ट्रायल्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यामुळे, ही प्रणाली लवकरच भारतीय नौदलात समाविष्ट केली जाईल, अशी अपेक्षा आहे.

संबंधित पोस्ट

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते 26 एप्रिल रोजी ठाणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन…

जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून त्यांना शासकीय मदत तत्परतेने उपलब्ध करून द्या,वनसंपदेचा महसूल वाढवण्यासाठी फर्निचर निर्मितीवर भर

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन,· ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५

पालकमंत्री शिरसाट यांची पैठण शहरातील पूरग्रस्त भागास भेट..

vishwatmaklokswamivarta

उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री- संजय शिरसाट 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू…

vishwatmaklokswamivarta