vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची परीक्षा येत्या रविवारी जिल्ह्यातील निरक्षरांना साक्षर होण्याची संधी

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची परीक्षा येत्या रविवारी जिल्ह्यातील निरक्षरांना साक्षर होण्याची संधी

         अमरावती, प्रतिनिधी): ‘उल्लास – नवभारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत अमरावती जिल्ह्यात रविवार, दि. 15 मार्च रोजी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLANT) परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या निरक्षर व्यक्तींनी आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

       या परीक्षेचा मुख्य उद्देश 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या निरक्षर व्यक्तींना मूलभूत साक्षरता कौशल्ये प्रदान करणे हा आहे. यात वाचन, लेखन आणि गणितीय कौशल्ये तपासली जातील. केंद्र शासनाच्या ‘उल्लास’ या कार्यक्रमाअंतर्गत ही परीक्षा घेण्यात येत आहे, ज्यामध्ये निरक्षर व्यक्तींना केवळ साक्षर बनवणेच नाही तर त्यांना जीवनोपयोगी कौशल्ये, जसे की आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता आणि आरोग्यविषयक माहिती देणे हे देखील समाविष्ट आहे.

      परीक्षेसाठी, उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच, ओळखपत्र म्हणून मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक पासबुक यापैकी कोणतेही एक कागदपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्र हे त्याच शाळेत असेल जिथे उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत होणार असून, दिव्यांगांसाठी 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी 3 तासांचा असेल. परीक्षार्थी या परीक्षेसाठी वरील कालावधीत कधीही येऊ शकेल. ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तामिळ, बंगाली आणि उर्दू या माध्यमांमध्ये देता येईल. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रमाणपत्र दिले जाईल.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचा राज्य स्तरावर गौरव ‘सेतू सुविधा’ केंद्रांच्या माध्यमातून सुलभ प्रशासनासाठी सन्मान; ‘सेवा हक्क दिनी’ मुख्य सचिवांच्या हस्ते गौरव

ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार – महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे-पीडित मुलीशी व तिच्या कुटुंबीयांशी आदिती तटकरे यांनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

८.१२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

vishwatmaklokswamivarta

अकोट येथे महिला शिक्षिकांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृह परिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध …

vishwatmaklokswamivarta

१०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयातून चांगली आरोग्य सेवा मिळणार : रोहयो मंत्री भरत गोगावलेमहाड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भुमीपुजन…