vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन• नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन• नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन

 

जालना, प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सूक्ष्म व अतिसूक्ष्म उद्योजकांच्या व्यवसाय विस्ताराला चालना देण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि ‘दे आसरा’ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उद्योजक मेळावा व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार दि.24 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पार पडणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास केंद्र, जालना यांनी केले आहे.

स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणाऱ्या सूक्ष्म उद्योजकांना अनेकदा आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग आणि वित्तीय व्यवस्थापनात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर, उद्योजकांना योग्य दिशा मिळावी आणि त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. या सत्रात दे आसरा फाउंडेशनचे तज्ज्ञ आणि जिल्ह्यातील यशस्वी उद्योजक मार्गदर्शन करणार असून, नेटवर्किंग वाढवण्यासाठीही ही मोठी संधी ठरणार आहे. या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी https://forms.gle/DtPKMVVk2E3GmKBc7 या लिंकवर आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

कुष्ठरोगविषयक संदेश देणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांसाठी ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण; 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

मारवाडी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या शितला माता मंदिर परिसर स्वच्छता करा-विकासकुमार बागडी..

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानवडवळ नागनाथ येथे आयोजित समाधान शिबिराचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन▪️नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे, योजनांच्या लाभ पत्राचे वितरण 

राज्यातल्या २३ नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान.

vishwatmaklokswamivarta