vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना जिल्ह्यात 19 मार्च रोजी ‘यलो अलर्ट’ नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जालना जिल्ह्यात 19 मार्च रोजी ‘यलो अलर्ट’ नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

      जालना, प्रतिनिधी: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेणे गरजेचे आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी हवामान विभागाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष देऊन स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात 17 व 18 मार्च रोजी जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 19 मार्च रोजी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विजांचा कडकडाट आणि वादळी वारे सुरू असताना घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि उंच बांधकामांपासून दूर राहावे. मेघगर्जना होत असताना मोकळ्या मैदानात किंवा झाडाखाली उभे न राहता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. वीज कडकडत असताना घरातील विद्युत उपकरणांचा वापर शक्यतो टाळावा. शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत. पाळीव प्राण्यांना सुरक्षित गोठ्यात बांधावे. वाहनचालकांनी पावसाच्या वेळी वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवावा आणि सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करावे. असेही कळविले आहे.

 

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी जागरूक राहा – डॉ. धनंजय देशपांडे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने विशेष कार्यशाळा.

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान-महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी…

vishwatmaklokswamivarta

गर्भलिंगनिदान चाचणीची खबर देणाऱ्यास पारितोषिक नागरिकांनी माहिती द्यावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

शहरांची स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा**शहरे बकाल व घाणेरडी दिसणार नाहीत याची दक्षता घ्या- पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राने स्वच्छतेच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत *भारताच्या सर्वात ‘स्वच्छ राज्य’चा प्रतिष्ठेचा किताब पटकावला! राज्यातून – 1 सेवन स्टार, 2 फाइव स्टार, 82 वन स्टार गार्बेज फ्री शहरांचा दर्जा आणि 261 ओडीएफ़ प्लस प्लस शहरांचा मान मिळाला