vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अरुणोदय वॉकर्स चा 32 वे स्नेहसंमेलन बांद्राच्या एमआयजी मध्ये उत्साहात संपन्न

अरुणोदय वॉकर्स चा 32 वे स्नेहसंमेलन बांद्राच्या एमआयजी मध्ये उत्साहात संपन्न

मुंबई प्रतिनिधी-सकाळच्या फिरण्याबरोबर योगा हास्य क्लब हे नियमित असावे याकरता धडपडणारी व प्रत्यक्ष काम करणारी अरुणोदय वॉकर्स असोशियन या संस्थेच्या माध्यमातून 32 वे स्नेहसंमेलन बांद्रा 26 रोजी 2026 रोजी सायंकाळी पयेथील एमआयजी क्लब मध्ये यशस्वी व उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला

वांद्रे येथील एम आय जी क्लब मध्ये आयोजित कार्यक्रमाची सुरुवात  वंदन सरस्वतीला या गीताने झाली त्यानंतर लगेचच 80 90 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठांसाठी सन्मान सोहळा घेण्यात आला यामध्ये सर्वात ज्येष्ठ अनुभवी श्री निळकंठ दादा श्रीखंडे यांना विशेष सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ शाल देऊन गौरवण्यात आले त्यानंतरच्या जेष्ठमध्ये ज्येष्ठ व अनुभवी डॉक्टर श्री प्रभाकर देशपांडे कवयित्री लेखिका श्रीमती जयश्री चौधरी एडवोकेट श्री सीडी शेषाद्री श्रीमती विजया पटणी श्री रंगराजन श्री प्रदीप साने या सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी श्रीमती अंजली रिस्बूड श्री किरण भोगले श्री दिलीप गाडेकर व श्रीमती शिल्पा शिरोळे व्यासपीठावर उपस्थित होते  कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालवयातील कलाकार व बासरी वादक कुमार सोहम सुरेश मोठे यांनी तीन गाणे बासरी वादनाने सादर करून प्रेक्षकाची मने वेधून घेतली डॉक्टर अरुण पाटील यांनीही माऊथ ऑर्गन याद किया दिल से सादर केले श्री प्रणय काळे यांनीही कराओके माध्यमातून जलते है जिसके लिए तेरी आखो के लिए हे गाणे स्मिता नाईक यांनी स्वगत नाट्यरूपी सूर्यपुत्र कर्णवीर सादरीकरण केले श्रीमती जयश्री चौधरी यांनीही रूप तुझे छे निसर्गाचे अभिवाचन करून दाखविले लेखिका शिक्षिका योगा स्पेशल टीचर श्रीमती दीपिका गावडे रिटनिक योगा प्रत्यक्ष करून दाखवत प्रेक्षकांना नजर कैद केले

डान्सर स्पेशल शैलाजा सोमानी यांनीही डान्स परफॉर्मल द्वारे नृत्य सादर करून लक्ष वेधले ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती सीमा झिराड यांनी दमदार भाषेत कारे भुलला रे वर्णि लिया रंगा हे उत्कृष्ट नाट्याचे सादरीकरण केले श्री हरेश भाई रन्द्रिया यांनी विनोद सुविचार सुटके सादर करून दाखविले श्रीमती छाया साबळे ग्रुपने मिक्स तीन गाण्यावर सोलो डान्स परफॉर्मल सादर केलीत आणि शेवटी श्रीमती वसुंधरा देशपांडे श्रीमती शिल्पा शिरोळे या जोड गोळीने पथनाट्य सादर करून प्रेक्षकांमध्ये हशा पिकविल्या त्यानंतरही इतर सदस्यांनी सांस्कृतिक मनोरंजनात्मक गाण्यांचं सादरीकरण केले सदर कार्यक्रमासाठी श्रीमती अंजली देशमुख सुनंदा भोगले भारती पोळ शिल्पा शिरोळे शिल्पा शिरोळे शैलजा सोमाणी वसुंधरा देशपांडे तसेच श्री दिलीप गाडेकर किरण भोगले किसन पारवे या टीमने परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी स्नेह भोजनाचा सामूहिक आनंद घेतला

संबंधित पोस्ट

एड्स जनजागृतीसाठी बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

vishwatmaklokswamivarta

पैठण रस्त्यावरील रहदारीसाठी पर्यायी वाहतुक मार्ग

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ततिवसा येथे ‘युनिटी पदयात्रा’ संपन्न

vishwatmaklokswamivarta

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास विधी सेवा प्राधिकरणात दावा दाखल करता येणार   – सचिव गि. ग. कांबळे- कायदेशीर वारसांना सहा लाखांची भरपाई- मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

vishwatmaklokswamivarta

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम- परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

vishwatmaklokswamivarta