vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य प्रतिनिधी-#विधानपरिषदप्रश्नोत्तरे

मुंबई शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी १२ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी अत्यंत कुशल आणि तत्पर तपास केला आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध असल्याचे समोर आले असून, त्यातील काही ऑपरेटिव्ह परदेशातून कार्यरत असल्याचेही निदर्शनास आले आहे. एका प्रमुख आरोपीच्या भावालाही अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी सध्या परदेशात असल्याने त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

संबंधित पोस्ट

आपत्ती निवारणासाठी प्रशासन अलर्ट; पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश दारव्ह्यातील दहेली येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक, आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांचा घेतला आढावा

डोंबिवलीत राष्ट्रीय सुरक्षा जनजागृती कार्यक्रम संपन्न

आताची मोठी बातमी-केरळचे माजी मुख्यमंत्री पी.विजयन यांच्या निवासस्थानासह संबंधीत १२ ठिकाणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाचे छापे सुरु…..

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्वे करावा-उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मार्च महिन्यातील सेवानिवृत्तांचा सन्मान

बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यस्तरीय एसआयटी करणार चौकशी आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्न : शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती