vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मार्च महिन्यातील सेवानिवृत्तांचा सन्मान

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मार्च महिन्यातील सेवानिवृत्तांचा सन्मान

 

          नवी मुंबई प्रतिनिधी -सेवानिवृत्ती हा आयुष्यातील फक्त एक टप्पा असून यानंतरच्या काळात कामाच्या व्यस्ततेमुळे करायच्या राहून गेलेल्या आपल्या मनातील गोष्टींना, कुटुंबियांना भरपूर वेळ द्या, वेळेचे आणि अर्थकारणाचे योग्य नियोजन करा आणि आनंदी आयुष्य जगा अशा शब्दात परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांनी मार्च महिन्यात सेवानिवृत्त होणा-या 5 अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या.

 नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या या सेवानिवृत्ती सन्मान समारंभप्रसंगी उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्यासमवेत महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, भांडार विभागाचे उपआयुक्त श्री.शंकर खाडे, विधी अधिकारी श्री.अभय जाधव आणि अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर यांनी जीवनाचे सार सांगणारी कविता सादर केली. तसेच श्री.शंकर खाडे आणि श्री.अभय जाधव यांनीही मनोगते व्यक्त करीत सेवानिवृत्तांना शुभेच्छा दिल्या.

   नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून मार्च महिन्यात निवृत्त होणारे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.संजीव पाटील, उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.सतीश सनदी, शिक्षिका श्रीम.पुष्पा वाघमारे, आरोग्य पर्यवेक्षक श्री.पांडुरंग येमले व जोडारी श्री.दत्तात्रय दैवज्ञ या 5 अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

0000000

संबंधित पोस्ट

डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण: पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक

vishwatmaklokswamivarta

जालना महापालिकेत GST अनुदान मंजूर झाल्याबद्दल आनंद…

कोंकण विभाग स्तरावरील प्रजासत्ताक दिन,विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न-पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राजभवन झाले लोकभवन

vishwatmaklokswamivarta

मकर संक्रांतीचे महत्त्व-   अध्यात्मिक वार्ता- 

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा सर्वसाधारण सभेने मंजूर केला सन 2026-27 वर्षाचा 6904.43 कोटी रक्कमेचा नवी मुंबईच्या शाश्वत विकासाचा अर्थसंकल्प…