vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जेन ओ  पिक्सल ॲण्ड प्ले ॲण्ड ग्लोबल ई-स्पोर्ट गेम्स’ या कार्यक्रमाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जेन ओ  पिक्सल ॲण्ड प्ले ॲण्ड ग्लोबल ई-स्पोर्ट गेम्स’ या कार्यक्रमाचे उद्घाटन

राज्य प्रतिनिधी-एमएमआरडीए ग्राऊंड, बीकेसी, मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जेन ओ : पिक्सल ॲण्ड प्ले ॲण्ड ग्लोबल ई-स्पोर्ट गेम्स’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रात #गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण निर्माण करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही कंटेंट क्रिएटर्सनी विचारलेल्या प्रश्नांना खास शैलीत उत्तरे दिली.

राज्य शासन #क्रिएटर्स आणि ब्रँड्स यांच्यातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. क्रिएटर्ससाठी मजबूत इकोसिस्टम तयार करण्यावर भर दिला जात आहे. एव्हीजीसी (AVGC) धोरणाद्वारे क्रिएटर इकॉनॉमीला चालना दिली जात आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (#IICT) स्थापन करण्यात आली असून, हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे प्रशिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिले जाईल. राज्यातील ४० हजार गावांपैकी सुमारे ७० टक्के गावांमध्ये #फायबर नेटवर्क पोहोचले आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत प्रत्येक गावात उच्चगती इंटरनेट उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे गेमर्सना ‘लॅग-फ्री’ अनुभव मिळेल. महाराष्ट्रात १२ एव्हीजीसी हब्स विकसित केले जात असून, त्याद्वारे जागतिक दर्जाचे गेम्स तयार करण्यासाठी आवश्यक इकोसिस्टम उभी केली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळाजवळ ५० एकर जागेवर कंटेंट क्रिएटर्ससाठी अत्याधुनिक कॉम्प्लेक्स उभारण्याची योजना आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कार्यक्रमास पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे, जेन ओचे संस्थापक श्रीपाद अष्टेकर आणि ग्लोबल ई-स्पोर्टस् फेडरेशनचे अध्यक्ष पॉल फॉस्टर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा २०२५ चा अंतिम निकालात सारथी, पुणे संस्थेच्या १२ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड…

मुख्य डाकघरात अत्याधुनिक एटीएम सेवा नागरिकांसाठी सुरु…

vishwatmaklokswamivarta

ठाकरे बंधूची युती सत्ता , स्वार्थ आणि अस्तित्वासाठी असून कोणाच्याही युती किंवा आघाडी झाल्या तरी महायुती भक्कम आहे – शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी; कृषी विभागाचे आवाह

ऐतिहासिक, भव्य-दिव्य अन् शिस्तबद्ध आयोजन !खर्‍या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद ! – सनातन संस्था

केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय!केंद्रीय मंत्रिमंडळाने GOBARdhan या भारताच्या राष्ट्रीय एकात्मिक संपीडित बायोगॅस (CBG) योजनेला ₹२३,७३१ कोटींच्या खर्चास मंजुरी…