vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्य डाकघरात अत्याधुनिक एटीएम सेवा नागरिकांसाठी सुरु…

मुख्य डाकघरात अत्याधुनिक एटीएम सेवा नागरिकांसाठी सुरु…

बुलढाणा, प्रतिनिधी: येथील मुख्य डाकघराच्या आवारात नव्याने अद्ययावत स्वरूपात पुनः सुरू करण्यात आलेल्या एटीएम सेवेचा शुभारंभ डाकघर विभागाचे अधीक्षक गणेश अंभोरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. डाक विभागाच्या तसेच इतर सर्व बँकांच्या ग्राहकांना 24 X 7 सेवा देणारे हे एटीएम आता नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे.

या उद्घाटन प्रसंगी सहायक अधीक्षक कैलास तायडे, सहायक अधीक्षक सतीश निकम, बुलढाणा मुख्य डाकघराचे पोस्टमास्टर आशीष इंगळे तसेच आयपीपीबी बुलढाणा शाखेचे वरिष्ठ प्रबंधक हिमांशु धल, तसेच डाक विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डाक विभागाच्या ग्राहकांसह सर्वच बँकिंग ग्राहकांनी या अत्याधुनिक एटीएम सेवांचा लाभ घ्यावा. अशाच स्वरूपाची सेवा मुख्य डाकघर खामगाव येथेही सुरू करण्यात आली असून तेथील नागरिकांनीही या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश आभोरे यांनी केले.

00000

संबंधित पोस्ट

300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचे  भूमिपूजन

यंदा लोणार पर्यटन महोत्सव होणार पर्यटन मंत्री यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा सक्ती : नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर दंड व मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित

माजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक साठी पदभरती

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहन;  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!