vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

माजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक साठी पदभरती

माजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक साठी पदभरती

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी) – सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (गट-क) या पदांच्या भरतीसाठी एकूण 72 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेल्या माजी सैनिकांसह, सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार युद्धकाळात किंवा युद्ध नसताना सैनिकी सेवेत मृत्यू झालेल्या किंवा अपंगत्व येऊन सेवेस अयोग्य ठरलेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एक पात्र व्यक्तीस, पसंतीक्रमानुसार निवड करण्यात येणार आहे

72 पदांपैकी 3 पदे किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव असून, दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदाऱ्यांचा विचार करून गुणवत्ता व उपलब्धतेनुसार भरती करण्यात येणार आहे.

भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन (TCS-ION) यांच्या मार्फत राबविण्यात येणार असून, परीक्षेसाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.पात्र उमेदवारांनी वेब-आधारित ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

भूमि लोकअदालत दि.१३ रोजी..

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा-माळीपुरा लवकरच सावित्रीबाई फुलेनगर या नावाने ओळखला जाईल-आ.खोतकर..

vishwatmaklokswamivarta

नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरहून संसद भवनावर मार्च, संसद भवन परिसरात  सुरक्षित वाढ…

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील ७ शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

अग्निवीर भरतीसाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे१० ते १२ ऑगस्टदरम्यान आयोजन; इच्छुक युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

नविण्यामार्ग – संमिशन महाराष्ट्र : हतबल पत्रकारितेला स्वावलंबी बचा राजदीप काळे-व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य महिला शिखर अधिवेशनाची फलश्रुती राज्यनाततून अनेक पत्रकार महिलांचा सहभाग..