vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट आमदार सुधाकर अडबाले यांनी मागण्यांबाबत दिले मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट आमदार सुधाकर अडबाले यांनी मागण्यांबाबत दिले मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

गडचिरोली : प्रतिनिधी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री मा. ना. चंद्रकांत दादा पाटील यांची विधान भवन येथे आमदार श्री सुधाकर अडबाले यांनी भेट घेऊन उच्च शिक्षण विभागातील विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी गडचिरोली येथे सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी, विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण नागपूर येथील रिक्त पीठासीन अधिकारी पदी नियमित अधिकारी नियुक्त करण्यात यावा, राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील कार्यरत कर्मचारी यांचे सन २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांचे नियुक्ती दिनांक पासून डीसीपीएस (परिभाषित अंशदान योजना) मूळ पगाराच्या १०% प्रमाणे शासन हिश्याच्या रकमेची मागणी करून कर्मचाऱ्यांच्या खात्यात भरणा करण्यात यावा, डीसीपीएस/एनपीएस निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत दि. १.११.२००५ रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक यांच्या जुन्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ सेवा जोडण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात यावे व अन्य मागण्यांबाबत चर्चा करून आमदार सुधाकर अडबाले यांनी मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले.

यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्री. दिलीप कडू, राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. अनिल भारसाकळे, अमरावती शहर अध्यक्ष श्री. नंदकिशोर नवरे यांची उपस्थिती होती.

000000

संबंधित पोस्ट

डिजिटल शेती शाळेत शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्या-अंडी नष्ट, परिसरात हाय अलर्ट..

vishwatmaklokswamivarta

नागरी सुविधापूर्तीप्रमाणेच नागरिक सुरक्षेलाही महत्व देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान;दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम

vishwatmaklokswamivarta

वैष्णवी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया …

छत्रपती शिवरायांना मानवंदना देत ‘दुर्गोत्सव’ या प्रेरणादायी उपक्रमात सहभागी होण्याचे महाराष्ट्र शासनाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta