vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या बालिकेची सुटका; चाईल्ड हेल्प लाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई

सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या बालिकेची सुटका; चाईल्ड हेल्प लाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई

बुलढाणा प्रतिनिधी: मलकापूर येथील वरखेड गावात सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या 14 वर्षीय बालिकेची चाईल्ड हेल्प लाईन 1098, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व मलकापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुटका केली.

दि. 22 मार्च 2026 रोजी या घटनेची माहिती चाईल्ड हेल्प लाईनला प्राप्त होताच प्रकल्प समन्वयक शेख सोहेप यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बाल कल्याण समिती यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू केली. यानंतर चाईल्ड हेल्प लाईनच्या पथकाने वरखेड येथे भेट देऊन चौकशी केली असता संबंधित बालिकेला सावत्र आईकडून मारहाण होत असल्याचे निष्पन्न झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविण्यात आले.

चाईल्ड हेल्प लाईनच्या पथकाने बालिकेसह तिच्या मोठ्या भावाला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांनी चौकशी करून संबंधित सावत्र आईविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बालिकेला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असता, समितीच्या आदेशानुसार तिला संरक्षण व काळजीच्या दृष्टीने सखी वन स्टॉप सेंटर, बुलडाणा येथे दाखल करण्यात आले. यानंतर चाईल्ड हेल्प लाईनच्या समुपदेशकांनी बालिकेचे समुपदेशन केले. सदर प्रकरणाची पुढील कार्यवाही बाल कल्याण समिती, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

0000

संबंधित पोस्ट

जिल्हा कारागृहात वृक्षारोपणाने जागतिक पर्यावरण दिन साजरा

सार्वजनिक गणेश व दुर्गा उत्सव मंडळांना कायमस्वरूपी नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुढील ३ तासात लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची; तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.

vishwatmaklokswamivarta

पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …

धाकलगावात शंकरपटाचा थरार! बैलगाड्यांच्या वेगवान दौडीने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध…

ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे,महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन उत्साहात संपन्न